शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

वाहन चालक-मालकांनी इकडे लक्ष द्यावे! 'फिटनेस'वर गडकरींच्या मंत्रालयाने घेतला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 5:56 PM

Ministry of Road Transport and Highways : अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) फिटनेस मिळवावा लागेल. 

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत (fitness) मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून वाहनांचे फिटनेस  सरकारद्वारे रजिस्टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) करणे बंधनकारक आहे. याशिवाय, इतर कोणत्याही फिटनेस सेंटरमधील फिटनेस वैध असणार नाही. 

यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी डेड लाइन ठेवली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) फिटनेस मिळवावा लागेल. 

1 एप्रिल 2023 पासून अवजड वाहने आणि अवजड प्रवासी वाहने आणि मध्यम भार असलेली वाहने आणि प्रवासी वाहने आणि कमी वजनाची वाहने 1 जून 2024 पासून सरकारी मान्यताप्राप्त ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनवरून (Automated Testing Station) करणे बंधनकारक असेल. तसेच, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दोन वर्षांसाठी आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी एक वर्षाचे असणार आहे.

याचबरोबर, रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत या संदर्भात जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांना 30 दिवसांत सूचना करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. लोक आक्षेप आणि सूचना संयुक्त सचिव (परिवहन), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 यांना किंवा comments-morth@gov.in या ईमेलद्वारे पाठवू शकतात.

टॅग्स :AutomobileवाहनNitin Gadkariनितीन गडकरी