नवी दिल्ली : मारुती सुझुकी अल्टो एकूण पाच व्हेरिएंटमध्ये येते. यामध्ये ALTO STD (O), ALTO LXI(O)s, ALTO VXI, ALTO VXI+ आणि ALTO LXI (O) CNG मध्ये येतात. यात 796 cc चे F8D, 3 सिलेंडर इंजिन आहेत, जे पेट्रोलवर वेगळी आणि CNG वर वेगळी पॉवर जनरेट करतात. तसेच, पेट्रोलवर 35.3 kW @ 6000 rpm पॉवर जनरेट करू शकते तर CNG वर 30.1 kW @ 6000 rpm ची पॉवर जनरेट करू शकते. मात्र, सीएनजीवर मायलेज जास्त आहे. हे CNG वर 31km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. दिल्लीतील मारुती सुझुकी अल्टोची किंमत 3.39 लाख ते 5.03 लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरूम आहेत.
मारुती सुझुकी अल्टोच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमती-ALTO STD (O)- 3.39 लाख रुपये-ALTO LXI(O)s- 4.08 लाख रुपये-ALTO VXI- 4.28 लाख रुपये-ALTO VXI Plus- 4.41 लाख रुपये-ALTO LXI (O) CNG- 5.03 लाख रुपये
मारुती सुझुकी अल्टोचे सर्वात स्वस्त व्हेरिएंट ALTO STD (O) आहे, या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपये आहे. यामध्ये दोन एअरबॅग मिळतात, ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा थोडे अधिक सुरक्षित आहे. यापूर्वी, अल्टोचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट ALTO STD होता, जो फक्त एक एअरबॅगसह आला होता. मात्र, कंपनीने ते मॉडेल बंद केले आहे आणि सध्या सर्वात कमी व्हेरिएंटमध्ये दोन एअरबॅग देखील आहेत. याशिवाय रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस विथ ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमही उपलब्ध आहेत.