नवी दिल्ली : तुम्हीही मारुती सुझुकीची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या महिन्यात मारुती बलेनोवर मोठी सवलत देण्यात येत आहे. मारुती सुझुकी बलेनोच्या पेट्रोल मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीएनजी व्हेरिएंटवर ग्राहक ऑफर आणि एक्सचेंज लाभसह एकूण ३५,००० रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.
२ ते १९ सप्टेंबर दरम्यान कार बुक केल्यास सवलतीच्या रकमेत पाच हजार रुपयांची विशेष फेस्टिव्हल ऑफर देखील समाविष्ट आहे. मारुती सुझुकी बलेनोला ९० एचपी, १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ५-स्पीड मॅन्युअल किंवा ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्ससह मिळते. सीएनजीवर चालणारी बलेनो फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.
याचबरोबर, या कारचे इंटीरियर अतिशय शानदार बनवण्यात आले आहे. यामध्ये ९-इंचाची टचस्क्रीन आहे, जी कनेक्टेड फीचर्स आणि फास्ट-चार्जिंग रियर एसी व्हेंटसह येते. तसेच, सुरक्षेबाबतही काम करण्यात आले आहे. बलेनोच्या टॉप ट्रिममध्ये आता सहा एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, हिल होल्ड असिस्ट, ३६०-डिग्री कॅमेरा आहे.
मारुती बलेनो फक्त एक इंजिन ऑप्शनह ऑफर केली जाते. हे इंजिन १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल, जे ९० पीएस आणि ११३ एनएम जनरेट करते. हे ५-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. हे इंजिन मारुतीच्या इतर काही मॉडेल्समध्ये माइल्ड-हायब्रीड टेक्नॉलॉजीसह दिलेले आहे, बलेनो फक्त इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजीवर काम करते. तसेच, नवीन इंजिन मॅन्युअलसह २२.३५ किलोमीटर प्रती लिटर आणि एएमटीसह २२.९४ किलोमीटर प्रती लिटर मायलेज देते.