नवी दिल्ली : मारुती ब्रेझा सीएनजी (Maruti Brezza CNG) भारतात लाँच झाली आहे. ही सीएनजी एसयूव्ही कंपनीने 2023 ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. ही नवीन सीएनजी कार एकूण 4 व्हेरिएंटमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ज्यामध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi ड्युअल टोनचा समावेश आहे. हे मारुती सुझुकीच्या ARENA डीलरशिपद्वारे विकले जाईल. ब्रेझा सीएनजीची डिझाइन पेट्रोल मॉडेलप्रमाणेच आहे. याशिवाय, नवीन ब्रेझा सीएनजीला ग्रँड विटारा, एर्टिगा आणि मारुती XL6 सारखे इंजिन ऑप्शन मिळतात.
फीचर्सकार पेट्रोल आणि सीएनजी फ्यूल लिड, सीएनजी ड्राइव्ह मोड, डिजिटल-अॅनालॉग फ्यूल गेज आणि फ्यूल चेंज स्विच यांसारख्या फीचर्ससह येते. याशिवाय, कारमध्ये 9-इंचाचा स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले, कीलेस पुश स्टार्ट आणि क्रूझ कंट्रोल आहे.
इंजिनया एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर K15C ड्युअल-जेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटचा सपोर्ट आहे. सीएनजी मोडमध्ये कारचे इंजिन 87.8 PS ची पॉवर आणि 121.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोल मोडमध्ये कारचे इंजिन 100.6PS आणि 136Nm आउटपुट मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, कार 25.51km/kg पर्यंत मायलेज देऊ शकते.
किंमतमारुती ब्रेझा सीएनजीची सुरुवातीची किंमत 9.14 लाख रुपये आहे, जी 12.06 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत. ब्रेझा सीएनजीची भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सॉन सीएनजीशी स्पर्धा होईल, जी येत्या काही दिवसांत लॉन्च केली जाणार आहे. दरम्यान, ब्रेझा सीएनजी हे मारुतीचे 14 वे प्रोडक्ट आहे, जे फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह येते. यासह, आता ARENA डीलरशिप नेटवर्कमध्ये विकल्या जाणार्या सर्व कारमध्ये सीएनजी ऑप्शन मिळेल.