नवी दिल्ली : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्हाला मारुतीच्या कारवर 74,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. इतकंच नाही तर कंपनी तुम्हाला देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्या Maruti Suzuki WagonR वर 'शगुन'चे (डिस्काउंटमधून बचत) संपूर्ण 51,000 रुपये देखील देत आहे. जाणून घ्या, मारुतीच्या कोणत्या कारवर किती सूट मिळत आहे...
मारुतीचे सर्वात लोकप्रिय वाहन WagonR ला जुलैमध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा कस्टमर बेनिफिट्स मिळत आहेत. याशिवाय, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. अशाप्रकारे मारुती WagonR खरेदी करणाऱ्यांपैकी संपूर्ण 51,000 रुपयांची बचत होते. मात्र, CNG WagonR वर कोणतीही सूट नाही.
मारुती सुझुकीच्या Tour सीरिजच्या कारवर जुलैमध्ये सर्वाधिक 74,000 रुपयांपर्यंत बचत होत आहे. यामध्ये Tour H3 वर 30,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सजेंज बोनस आणि 29,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. Tour H3 ही मारुती WagonR ची फ्लीट व्हर्जन आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही Tour M वर (Ertiga Fleet Version) 4,000 रुपये, Tour V वर (Eeco Fleet Version) 36,500 रुपये, Tour S वर (Dzire Fleet Version) 34,000 रुपये आणि Tour H1 वर (Alto Fleet Version) 34,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
सर्वात स्वस्त अल्टोवर 31,000 रुपयांची बचत देशातील सर्वात स्वस्त कारपैकी एक मारुती अल्टो (Maruti Alto July Discount Offer) जुलैमध्ये पेट्रोल स्टँडर्ड व्हर्जनवर 11,000 रुपयांची तर उर्वरित व्हर्जनवर 31,000 रुपयांची बचत होत आहे. या कारच्या सुद्धा CNG मॉडेलवर कोणत्याही ऑफर नाहीत. त्याचप्रमाणे, तुम्ही Celerio वर 51,000 रुपयांपर्यंत, S-Presso वर 31,000 रुपयांपर्यंत, Dezire वर 22,000 रुपयांपर्यंत, Eeco वर 24,000 रुपयांपर्यंत आणि Swift वर 32,000 रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.