कंपन्यांसाठी सप्टेंबर महिना हा अत्यंत लकी ठरला आहे. या महिन्यात अधिकांश कंपन्यांनी पॉझिटिव्ह ग्रोथ नोंदवली आहे. मारुती सुझुकीची अल्टो ही देशातील सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. हिच्या तब्बल 24,844 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच, मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली गेलेली एसयूव्ही कार ठारली आहे. यातच मारुतीच्या आणखी एका गाडीने विक्रीचा विक्रम बनवला आहे. कंपनीची स्वस्त कार सप्टेंबर 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विकली गेलेली 7 सीटर कार ठरली आहे. विशेष म्हणजे, या कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.
या 7 सीटर कारची सर्वाधिक विक्री -आम्ही ज्या गाडी संदर्भात बोलत आहोत, त्या गाडीचे नाव आहे मारुती सुझुकी ईको (Maruti Suzuki Eeco). ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार तर आहेच, पण देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कारही आहे. गेल्या महिन्यात या गाडीच्या 12,697 युनिट्सची विक्री झाली आहे. तर सप्टेंबर 2021 मध्ये या गाडीच्या 7,844 युनिट्सची विक्री झाली होती. अशा प्रकारे मारुती ईकोने 61 टक्क्यांची ग्रोथ नोंदवली आहे.Maruti Eeco ची किंमत आणि फीचर्स -मारुती ईकोची किंमत 4.63 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.94 लाख रुपये एक्स-शोरूम पर्यंत जाते. हिची लांबी 3,675mm तर रुंदी 1,475mm आणि ऊंची 1,800mm एवढी आहे. हिच्या व्हीलबेससंदर्भात बोलायचे झाल्यास, ते 2,350 mm आहेत. मारुती ईकोमध्ये डुअल टोन इंटीरिअरसह छान एसी (AC), जबरदस्त केबिन स्पेस, रिअर पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
मारुती ईको पेट्रोल आणि सीएनजी, अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. यात 1.2 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजीन आहे, जे 73PS ची पॉवर आणि 98Nm टॉर्क जनरेट करतो. तसेच, CNG किटसह हिचे इंजीन 63PS पॉवर आणि 85Nm टॉर्क जनरेट करते. हिचे पेट्रोल व्हेरिअंट 16.11kmpl मायलेज देते तर सीएनजी व्हेरिअंट 20.88 kmpl एवढे मायलेज देते, असा दावा कंपनी केला आहे.