भारतात एसयूव्ही कारसोबतच 7 सीटर कारची मागणीही झपाट्याने वाढत आहे. ज्याचे कुटंब मोठे आहे अथवा ज्यांना व्यावसायिक वापरासाठी कर घ्यायची आहे, ते लोक सध्या 7 सीटर कारला प्राधान्य देत आहेत. जर आपणही 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही आपल्याला एक उत्तम पर्याय सांगत आहोत. खरे तर, सध्या मारुती एर्टिगाची मागणी प्रचंड वाढली आहे. मार्च महिन्यातही या कारच्या 9000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
सध्या, मारुती एर्टिगा MPV च्या बेस व्हेरिअंटची किंमत 8.35 लाख रुपये आहे तर टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 12.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. कंपनी या कारच्या VXI आणि ZXI या दोन्ही व्हेरिअंटसोबत CNG किटही ऑफर करते. विशेष म्हणजे, या कारमध्ये आपल्याला 209 लिटर एवढा बूट स्पेसही मिळेल. मात्र, आपल्याला ही जागा कमी वाटत असेल, तर आपण तिसर्या-रांगेतील सीट्स फोल्ड करू शकता, यानंतर हा बूट स्पेस 550 लिटरपर्यंत वाढेल.
इंजिन -या कारमध्ये 1.5-लिटर डुअलजेट पेट्रोल इंजिन मिळते, या बरोबरच माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. हे इंजिन 103 पीएस आणि 136.8 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजीमध्ये हिचे आउटपुट 88 पीएस आणइ 121.5 एनएम असते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सदेखील मिळतो.
मायलेज --- पेट्रोल मॅन्युअल : 20.51KMPL-- पेट्रोल ऑटोमॅटिक : 20.3KMPL-- एर्टिगा सीएनजी : 26.11KMPKGफीचर्स -या कारमध्ये नवे 7-इंचाचे स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम देण्यात आले आहे. तसेच, पॅडल शिफ्टर्स, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी (टेलीमॅटिक्स), क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, ऑटो एसी, ड्यूल एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, ब्रेक असिस्ट, रियर पार्किंग सेंसर्स, आयएसोफिक्स चाइल्ड सीट एंकरेज, टॉप व्हेरिअंट्समध्ये दोन अधिकच्या एअरबँग्ज (कुल 4) आणि ईएसपीसह हिल होल्ड कंट्रोल देण्यात आले आहे.