नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही मारुती सुझुकी एर्टिगा आहे. गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये मारुती एर्टिगाच्या (Maruti Ertiga) एकूण 10494 युनिट्सची विक्री झाली आहे. यामुळे एर्टिगा आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की, याशिवाय इतर एमपीव्हीची विक्री होत नाही. तर किया कॅरेन्सची (Kia Carens) विक्री देखील चांगली होत आहे. ज्या लोकांना मारुती एर्टिगा आवडत नाही, ते किया कॅरेन्सकडे पर्याय म्हणून पाहू शकतात. किया कॅरेन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घ्या...
फीचर्सकिया कॅरेन्समध्ये 10.25-इंच टचस्क्रीन (वायरलेस अँड्राइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले सह), फूल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कनेक्टेड कार टेक, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पेन सनरूफ, बोस साउंड सिस्टम, दुसऱ्या रोमध्ये इलेक्ट्रिक डबल फोल्डिंग सीट्स, ड्रायव्हर-सीटर हाइट अॅडजस्टमेंट, क्रूझ कंट्रोल, 64 एंबिएंट लायटिंग, तीनही रोमध्ये डेडिकेटड एसी व्हेंट्स, एअर प्युरिफायर आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप यासरखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखे फीचर्स वैशिष्ट्ये देखील आहेत.
स्पेसिफिकेशनकिया कॅरेन्सला तीन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल (115PS/114Nm), 1.4 लिटर टर्बो पेट्रोल (140PS/242Nm) आणि 1.5 लिटर डिझेल (115PS/250Nm) असे आहेत. एमपीव्हीला इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत. हे 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन (ऑप्शनल) सह येतात. हे 6 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येतात. तर 6 सीटर ऑप्शन फक्त टॉप मॉडेल - लक्झरी प्लसमध्ये देण्यात आला आहे.
किंमतएर्टिगाची किंमत 8.41 लाख रुपयांपासून सुरू होते तर किया कॅरेन्सची किंमत 9.60 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये बेस व्हेरिएंटमध्ये जवपास एक लाख रुपयांचा फरक आहे. दरम्यान, टॉप व्हेरिएंटमध्ये खूप फरक आहे. टॉप व्हेरिएंटसाठी कॅरेन्सची किंमत 17.70 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.