शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

मारुती लॉन्च करतेय सर्वाधिक मायलेज देणारी नवी SUV, करा खरेदीची तयारी; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 6:47 PM

ग्रँड विटारा लॉन्च झाल्यानंतर, हिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, वोक्सवॅगन ताइगुन, स्कोडा कुशाक आणि टोयोटा हाय रायडरसोबत असेल.

मारुती सुझुकी सोमवारी भारतात अपली नवी मिड-साईज एसयूव्ही ग्रँड विटारा लॉन्च करत आहे. या एसयुव्हीमध्ये माइल्ड हाइब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन असे दोन ऑप्शन उपलब्ध असतील. ही कार टोयोटा आणि सुझुकी यांनी एकत्रितपणे कर्नाटकातील टोयोटाच्या फॅक्ट्रीमध्ये तयार केली आहे. 11,000 रुपयांच्या टोकनवर हिची बुकिंग केली जाऊ शकते. ऑक्टोबरपासून या गाडीचे बुकिंग सुरू होणे अपेक्षित आहे. महत्वाचे म्हणजे ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक म्हणजेच, 27.97 किमी प्रति लिटर एवढे मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

या कार सोबत असेल स्पर्धा -ग्रँड विटारा लॉन्च झाल्यानंतर, हिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, वोक्सवॅगन ताइगुन, स्कोडा कुशाक आणि टोयोटा हाय रायडरसोबत असेल. मारुती ग्रँड विटाराची किंमत 10 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.  तर टॉप-स्पेक स्ट्रांग हायब्रिड व्हेरिअंटची किंमत 20 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.

ग्रँड विटारा फीचर्स -मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये पॅनोरमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अॅम्बिएंट लायटिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, किलेस एन्ट्री, रिअर एसी व्हेंट, इंजीनला स्टार्ट/स्टॉप करण्यासाठी एक पुश बटन, यूएसबी पोर्ट, 9 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ग्रँड विटारा इंजिन -मारूती सुझुकी आणि टोयोटा या दोघांनी एकत्रितपणे हायरायडर आणि ग्रँड विटारा तयार केली आहे. हायरायडरप्रमाणेच ग्रँड विटाराला माइल्ड-हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आले आहे. हे 1462cc K15 इंजिन असून 6,000 RPM वर जवळपास 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. यात माइल्ड हायब्रिड सिस्टिम आहे आणि हिला 5-स्पीड मॅन्युअल अथवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्ट ऑटोमॅटिकसह जोडण्यात आले आहे. हे पॉवरट्रेनही आतापर्यंतचे AWD ऑप्शन असलेले एकमेव इंजिन आहे.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहन