नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड भारतात एक नवीन एसयूव्ही (SUV) लाँच करण्याच्या तयारीत आहे. मारुती जिम्नी (Maruti Jimny) ऑफरोड एसयूव्हीची भारतात बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आता कंपनी ही कार लाँच करण्याच्या तयारीत असून दोन व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. यामध्ये Zeta आणि Alpha व्हेरिएंटचा समावेश आहे. ही कार अनेक प्रीमियम फीचर्सने सज्ज असणार आहे.
ही कार जिम्नीच्या जागतिक थ्री-डोअर मॉडेलवर आधारित आहे. जरी नवीन जिम्नी अनेक बाबतीत सध्याच्या मॉडेलपेक्षा चांगली असेल. ही कार लॅडर फ्रेम चेसिसवर आधारित असणार आहे. मारुती सुझुकी जिम्नीचे डिपार्चरस अँगल 50 डिग्री आहे, रॅम्प ब्रेकओव्हर अँगल 24 डिग्री आहे आणि अप्रोच अँगल 36 डिग्री आहे. कारची लांबी 3,985 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि 1,720 मिमी उंची आहे. तसेच, 2,590 मिमीच्या व्हीलबेसची लांबी आणि 40 लिटरची फ्यूल कॅपॅसिटी आहे.
कारचे वजन जवळपास 1,200 किलो आहे आणि ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी आहे. जेव्हा मागील सीट खाली दुमडल्या जातात, तेव्हा जिम्नीची बूट स्पेस 322 मीटरपर्यंत वाढते. मारुती सुझुकी जिम्नीचा भारतात कोणताही थेट प्रतिस्पर्धी नसणार आहे. 5-डोअर असलेल्या ऑफ-रोडची सुरुवातीची किंमत जवळपास 10.5 लाख रुपये असणार आहे. कारच्या टॉप मॉडेलची किंमत 13 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.
शानदार इंटीरियर...पॉवरट्रेनला 5-स्पीड मॅन्युअल किंवा फोर-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर एटीसोबत जोडले जाईल. जे सुझुकीच्या ऑलग्रिप प्रो 4WD सिस्टिमद्वारे सँडर्ड म्हणून सर्व 4 चाकांना पॉवर ट्रान्सफर करेल. कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये वायरलेस Apple CarPlay आणि अँड्रॉइड ऑटो इंटिग्रेशनसह नऊ इंची स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, आर्कामिस ऑडिओ, 6 एअरबॅग्ज, सेगमेंट-फर्स्ट वॉशरसह ऑटोमेटिक एलईडी हेडलॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल इत्यादींचा समावेश आहे.