देशाची नंबर-1 कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी अनेक वर्षांपासून हॅचबॅक सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. मात्र, एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनीची पकड कमकुवत होती. या कारणास्तव, कंपनीनं ऑल न्यू ब्रेझा आणि ऑल न्यू ग्रँड विटारा लाँच केल्या. आता हे दोन्ही मॉडेल्स सुपरहिट झाले आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये कारची मागणी वाढली आहे. एवढंच नाही तर आता ब्रेझा या सेगमेंटमधील नंबर-1 कार बनली आहे. ब्रेझा सलग दुसऱ्यांदा या विभागात अव्वल ठरली आहे. इतकंच नाही तर या सेगमेंटमध्ये तिसऱ्यांदा टाटा नेक्सॉनला या कारनं मागे टाकलं आहे. मारुती ब्रेझाच्या 16,227 युनिट्स आणि टाटा नेक्सॉनच्या 12,439 युनिट्सची गेल्या महिन्यात विक्री झाली.
ब्रेझाचं वर्चस्वमार्च २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार्सच्या यादीत 5 एसयुव्ही मॉडेल्सचा समावेश होता. यामध्ये मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा, टाटा पंच आणि मारुती ग्रँड विटारा यांचा समावेश आहे. ब्रेझाच्या गेल्या महिन्यात 6227 युनिट्सची विक्री झाली. मार्च 2022 मध्ये ही संख्या 12439 युनिट्स होती. याचाच अर्थ यात 30.45 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली. तर दुसरीकडे नेक्सॉनच्या 14769 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. क्रेटाच्या 14026 युनिट्स, पंचच्या 10894 युनिट्स आणि ग्रँड विटाराच्या 10045 युनिट्सची विक्री झाली.
तिसऱ्यांदा नेक्सॉनला टाकलं मागेमारुती ब्रेझाने लाँच झाल्यापासून तिसऱ्यांदा टाटा नेक्सॉनला मागे टाकलं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये या कारनं नेक्सॉनला पहिल्यांदा मागे टाकलं. यानंतर या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्येही ब्रेझाने नेक्सॉनला मागे टाकलं. दरम्यान, मारुतीसाठी सेमीकंडक्टर समस्या अद्याप संपलेल्या नाहीत. सेमीकंडक्टरच्या समस्येमुळे कंपनीनं गेल्या तिमाहीत 46,000 युनिट्सचं उत्पादन कमी केलं. फेब्रुवारी पर्यंत ब्रेझाच्या 61,500 युनिट्सचं बुकिंग पेंडिंग आहे. त्याची डिलिव्हरी 22 आठवड्यांत म्हणजे सुमारे 154 दिवसांत केली जाईल.
ब्रेझाचं इंजिन आणि ट्रान्समिशननवीन ब्रेझामध्ये नवीन जनरेशन के-सीरीज 1.5-ड्युअल जेट डब्ल्यूटी इंजिन देण्यात आलेय. हे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येतं. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेलं असून ते 103hp पॉवर आणि 137Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारची फ्युएल एफिशिअन्सी वाढल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. नवीन ब्रेझाचं मॅन्युअल व्हेरिएंट 20.15 km/l चं मायलेज देईल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट 19.80 km/l मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. ब्रेझा चार ट्रिम्स LXi, VXi, ZXi आणि ZXi+ मध्ये लाँच करण्यात आली आहे.