नवीन कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकदा लोकांचा कार खरेदीशी भावनिक संबंध जोडलेला असतो. तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर नुकतीच लाँच झालेली व सर्वाधिक विक्रीचा खिताब मिरविणारी Maruti Suzuki Alto K10 हा बाजारात उपलब्ध असलेला चांगला पर्याय आहे. विश्वासार्हता, कॉम्पॅक्ट लुक आणि कमी देखभाल खर्चासाठी ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहे. कंपनीने इम्पॅक्टो आणि ग्लिंटो पर्सनलायझेशन थीम देखील ऑफर केली आहे. Maruti Suzuki Alto K10 मध्ये अंतर्गत आणि बाहेरून सुंदर दिसण्यासाठी हनीकोम्ब पॅटर्न ग्रिल देण्यात आले आहे. आतमध्ये नवीन डॅशबोर्ड लेआउट देण्यात आला आहे. Alto K10 च्या थर्ड-जेनमध्ये पाच जणांना आरामात बसता येईल अशी जागा देण्यात आली आहे. या कारसाठी ग्लोव्हबॉक्स देखील सुयोग्य आकाराचा आहे. नव्या Alto K10 मधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची यादीदेखील मोठी आहे. ग्राहकांना संपूर्ण-नवीन आणि समकालीन, आकर्षक वैशिष्ट्यांसह पॅक केलेल्या डिझाइनचा अनुभव घेता येईल. साइड प्रोफाईल आणि रीअर फॅसिआ आधुनिक, आकर्षक बनवण्याकरता नवीन आणि ट्रेंडी रीअर कॉम्बिनेशन लॅम्प्स ही Maruti Suzuki Alto K10 ची काही स्टँडआउट बाह्य वैशिष्ट्ये आहेत. समोरील पॉवर विंडोसह डिजिटल स्पीडोमीटर डिस्प्ले, कीलेस एंट्री आणि स्टीयरिंग व्हीलवर ऑडिओ आणि व्हिडिओ नियंत्रणे आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे Alto K10 ने ग्राहकांना गेली २२ वर्षे सेवा दिली आहे. ही कार नुकतीच #IndiaKiChalPadi या टॅगलाइनसह लॉन्च झाली होती. ती नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. एक दशकानंतर जेव्हा ऑल-न्यू Maruti Suzuki Alto K10 येते, तेव्हा परवडणाऱ्या श्रेणीची वाट पाहणाऱ्या सर्व कारप्रेमींसाठी ही एक नामी संधी असते. या लोकांना आधुनिकतेशी कनेक्ट करण्यासाठी Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसाठी सपोर्ट असलेली ७ इंची स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसह अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Alto K10 S-CNG कंपनीच्या नेक्स्ट-जेन के-सीरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनसह सुसज्ज आहे. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. वेगवेगळ्या ट्रान्समिशचे STD, LXi, VXi आणि VXi+ असे चार व्हेरिअंट देण्यात आले आहेत. तसेच सहा रंगातही ही कार उपलब्ध आहे. यामध्ये मेटॅलिक सिझलिंग रेड, मेटॅलिक स्पीडी ब्लू आणि प्रीमियम अर्थ गोल्ड असे तीन नवे रंग देखील आहेत. कारची लांबी आणि रुंदी तुम्हाला कमी जागेतही पार्किंग करण्याची सोय उपलब्ध करून देते. यामुळे तुम्हाला तुमची कार तुमच्या इच्छित स्थळाच्या जवळ नेता येते. Maruti Suzuki ने 5.95 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किमतीत Alto K10 CNG लाँच केले आहे. ही कंपनीच्या ताफ्यातील १३ वी सीएनजी कार आहे. Alto K10 सीएनजी कार 33.85 km/kg* चे मायलेज देते असा दावा आहे. Maruti Suzuki Alto K10 CNG इंटिरिअर हे पेट्रोल व्हर्जनच्या संबंधित VXi ट्रिम सारखेच आहे आणि त्यात समान वैशिष्ट्ये आहेत. कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारख्या 15 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये# देण्यात आली आहेत.
Alto K10 सीएनजी व्हेरिअंट फक्त VXi मध्येच उपलब्ध आहे. CNG व्हेरिअंटची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या Maruti Suzuki Alto K10 पेक्षा थोडी जास्त आहे. CNG आवृत्तीची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या Maruti Suzuki Alto K10 पेक्षा थोडी जास्त आहे. तर इतर ट्रिम्सबद्दल बोलायचे झाल्यास, Std LXi, VXi आणि VXi+ मॅन्युअल व्हेरियंटची किंमत रु. 3.99 लाख आहे, त्यानंतर रु. 4.82 लाख, रु. 5 लाख आणि रु. 5.34 लाख आहे. जर तुम्ही पॉकेट फ्रेंडली कारच्या शोधात असाल तर मारुती सुझुकी अल्टो K10 हा चांगला पर्याय आहे. कमी खर्चात तुम्ही तुमच्या कुटुंबासह तुमच्या आवडीच्या ठिकाणी प्रवास करू शकाल.
* डिस्क्लेमर : CMVR 1989 च्या नियम 115 अंतर्गत चाचणी एजन्सीने प्रमाणित केल्यानुसार फ्युअल इफिशिएन्सी
# डिस्क्लेमर: एअर बॅगसह सुरक्षा वैशिष्ट्यांच्या कार्यप्रणालीच्या तपशीलांसाठी ओनर मॅन्युअलमधील संदर्भ पाहावेत.