ग्राहकांमध्ये मारुती सुझुकीच्याकारची खूप क्रेझ वाढताना दिसून येत आहे. त्यामुळेच कंपनीचे काही मॉडेल्स आहेत, ज्यांचा प्रतीक्षा कालावधीही (वेटिंग पीरियड) वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये गेल्या जून महिन्यात कंपनीच्या ३ लाख ८६ हजार ऑर्डर्स पेंडिंग असल्याचे दिसून आले होते.
कंपनीच्या ३,८६,००० पेंडिंग ऑर्डरमध्ये लेटेस्ट एसयूव्ही जिम्नी देखील सामील आहे. मारूती कंपनीला महिंद्राच्या थार कारला टक्कर देणाऱ्या जिन्मीसाठी ३१ हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी ब्रेझाच्या ५५ हजार बुकिंगची डिलिव्हरी पेंडिंग सुरू आहे.
ब्रेझाची विक्रीब्रेझाच्या ग्राहकांमध्ये मागणी इतकी वाढत आहे की, गेल्या वर्षी जूनमध्ये या कारच्या विक्रीचा आकडा केवळ ४४०४ युनिट्स होता, तो यंदाच्या जूनमध्ये १० हजार ५७८ युनिट्सवर पोहोचला आहे. याचा अर्थ कारमध्ये वर्षानुवर्षे १४० टक्क्यांनी वाढ होत आहे.
ब्रेझाची किंमतमारुती सुझुकी ब्रेझाची किंमत ८ लाख २९ हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, ही किंमत या कारच्या बेस व्हेरिएंटची आहे. तसेच, या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १३ लाख ९८ हजार रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
ब्रेझाचा प्रतीक्षा कालावधीमारुती सुझुकीच्या एसयूव्ही ब्रेझाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, या कारचा प्रतीक्षा कालावधी ११ आठवड्यांवर पोहोचला आहे. तसेच, असे म्हटले जात आहे की, या कारचा प्रतीक्षा कालावधी आणखी वाढू शकतो.