मारुतीची ब्रेझा ही कार कायती त्यांच्या ताफ्यातील सर्वात सुरक्षित कार आहे. ही कार आता फक्त पेट्रोलमध्येच येत असली तरी मारुतीच्या दाव्यानुसार २० किमीचे मायलेज देते. दहा लाखांच्या रेंजमध्ये सध्या ही कार एसयुव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे.
मारुतीची ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या चार ट्रीममध्ये येते. ११ व्हेरिअंटपैकी एक तुम्ही निवडू शकता. परंतू तुमच्या बजेचमध्ये LXi, VXi हे दोनच पर्याय बसू शकतात. कारण एक्स शोरूम प्राइस 8.19 लाख रुपयांपासुन सुरु होते. रोड टॅक्स व इतर पाहिले तर ही कार साडे नऊ दहा लाखाला जाते. या कारचे सर्वात टॉपच्या व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 14.04 लाख रुपये आहे.
याकारमध्ये ९ इंचाचा स्मार्टप्ले डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हेडअप डिस्प्ले, इलेक्ट्रीक सनरुफ, व्हॉईस कमांड, वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याचबरोबर 360 डिग्री पार्किंग कैमरा, ईबीडी, एबीएस आणि ७ एअरबॅग देण्यात आल्या आहेत.
Maruti Brezza LXI प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 9,19,226 रुपये आहे. जर तुम्ही Brezza LXI ला 1 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह घेतली तर 8,19,226 रुपये कर्ज घ्यावे लागेल. व्याज दर 9% आणि कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत पकडला तर 17,006 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये व्याजापोटी द्यावे लागणार आहेत.
Maruti Suzuki Brezza VXI घेतली तर ऑन-रोड किंमत 10,69,198 रुपये आहे. एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर 9,69,198 रुपये कर्ज घ्यावे लागेल. दरमहा 20,119 रुपये EMI भरावा लागेल. 2.38 लाख व्याज द्यावे लागेल.