नवी दिल्ली : या नोव्हेंबर महिन्यात मारुती सुझुकी (Maruti Suzuki) निवडक मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स मिळू शकतात. ब्रँडच्या नुकत्याच लाँच झालेल्या हॅचबॅक Alto K10 वर एकूण 57,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत. यामध्ये 35,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, Alto K10 च्या एएमटी व्हेरिएंटवर एकूण 22,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत, ज्यामध्ये 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. मारुती सुझुकी S Presso मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 56,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत, ज्यामध्ये 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. S Presso च्या एएमटी व्हेरिएंटवर एकूण 46,000 रुपयांच्या ऑफर आहेत. S Presso च्या सीएनजी व्हेरिएंटवरही एकूण 35,000 रुपयांच्या ऑफर आहेत, ज्यात 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
Wagon R च्या ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 41,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत, ज्यात 20,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 15,000 रुपायांचा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. याचबरोबर, LXi आणि VXi या दोन मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 31,000 रुपयांच्या ऑफर आहेत. Wagon R च्या एएमटी व्हेरिएंटवर एकूण 21,000 रुपयांच्या ऑफर उपलब्ध आहेत. याच्या सीएनजी व्हेरिएंटवर एकूण 40,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत.
मारुती सुझुकी Celerio च्या मिड-स्पेक VXI मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 56,000 रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामध्ये 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंटचा समावेश आहे. याशिवाय, Celerio च्या LXi, ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएंटवर 41,000 रुपये आणि एएमटी व्हेरिएंटवर एकूण 21,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर एकूण 25,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत.
याशिवाय, DZire च्या एएमटी व्हेरिएंटवर एकूण 32,000 रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्यामध्ये 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंग बोनस मिळणार आहे. याचबरोबर, या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 17,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.