नवी दिल्ली: मारुती सुजुकी (Maruti Suzuki) ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपली हॅचबॅक कार मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Suzuki Celerio) लाँच केली होती. कंपनीने तेव्हा ही कार देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार असल्याचा दावा केला होता. परंतू तेव्हा कंपनीने फक्त पेट्रोलमध्ये ही कार लाँच केली होती. आता सेलेरिओचा सीएनजीमधील अवतार देखील कंपनी लवकरच लाँच करणार आहे.
जानेवारीच्या अखेरीस मारुती सेलेरिओ सीएनजी लाँच होणार आहे. या कारला कंपनीने १.० लीटर, ३ सिलिंडर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देणार आहे. तसेच ट्रान्समिशन ड्युटीसाठी या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात येणार आहे.
या कारच्या सीएनजी व्हर्जनमध्ये मायलेज आधीपेक्षा जास्त मिळणार आहे. ही कारा प्रति किलो सीएनजीमागे ३० किमीचे मायलेज देत असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच ही कार सीएनजीमध्ये देखील जास्त मायलेज देणार आहे.
आजच्या घडीला सेलेरिओ ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. ही कार 26.8kmpl मायलेज देते. मारुतीची ही नेक्स्ट जनरेशन K10C पेट्रोल इंजिनसोबत येणारी ही पहिली कार आहे. याच इंजिनावर मारुती अन्य कार देखील लाँच करणार आहे. हे इंजिन 65bhp ताकद आणि 89Nm टॉर्क प्रदान करते. ही कार ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससोबत एएमटीमध्ये देखील लाँच करण्यात आली आहे. ही कार 5th HEARTEC प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे.