नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सार्वकालिक उच्चांकावर आहेत. पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा विचार करण्यात येत आहे. अनेक कंपन्या आपल्या कार सीएनजी पर्यायात सादर करत आहेत. यामध्ये मारुती सुझुकी आघाडीवर असून, कंपनी आपली एक लोकप्रिय कार सीएनजी पर्यायात सादर केली आहे. जर तुम्हाला स्वस्तात मस्त सीएनजी कार खरेदी करायची असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन ठरू शकतो.
ही कार आहे मारुती सुझुकी सिलेरिया सीएनजी व्हेरिएंट. या कारची सुरुवातीची किंमत ७ लाखांपेक्षा कमी आहे. मारुती सुझुकी सेलेरियोच्या सीएनजी कार मध्ये पॉवरसाठी नवीन जनरेशनचे K10C पेट्रोल इंजिन दिले आहे. ही सीएनजी कार केवळ एकाच व्हेरियंटमध्ये येते. ग्राहकांना केवळ याच्या VXi व्हेरियंटमध्ये सीएनजीचे ऑप्शन मिळते.
सीएनजी सेलेरियोमध्ये ३२ लीटरच्या क्षमतेचे टँक
मारुती सुझुकीच्या सीएनजी सेलेरियो ६ कलर ऑप्शन मध्ये येते. यात स्पीडी ब्लू, ग्लिसटरिंग ग्रे, ऑर्टिक व्हाइट, सिल्की सिल्वर, सॉलिड फायर रेड आणि कॅफिन ब्राउनचा समावेश आहे. या कारमध्ये ३२ लीटरच्या क्षमतेचे टँक दिले आहे. ही सीएनजी कार ३५.६० किमी प्रति किलोग्रॅमचे मायलेज देते. याच्या पेट्रोल मॉडल मध्ये 26.68 kmpl पर्यंत मायलेज मिळते. मारुती सुझुकी सेलेरियोच्या सीएनजी कारची भारतीय बाजारातील दिल्ली एक्स शोरूम किंमत ६.५८ लाख रुपये आहे.