शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Maruti Suzuki Dzire S-CNG लाँच; 31 किमी पेक्षा जास्त मायलेज, कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 4:49 PM

Maruti Suzuki Dzire S-CNG : मारुती सुझुकी डिझायर सीएनजी ( Maruti Suzuki Dzire CNG) व्हीएक्सआय (VXi) आणि झेडएक्सआय (ZXi) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान मारुती सुझुकीने नवी सीएनजी कार लॉन्च केली आहे. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी (मारुती सुझुकी) ने मंगळवारी त्यांची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार डिझायरचे सीएनजी व्हेरिएंटला लॉन्च करण्याची घोषणा केली. मारुती सुझुकी डिझायर सीएनजी ( Maruti Suzuki Dzire CNG) व्हीएक्सआय (VXi) आणि झेडएक्सआय (ZXi) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

मारुती डिझायर सीएनजी व्हीएक्सआय व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.14 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मारुती डिझायर सीएनजी झेडएक्सआय व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.82 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने डिझायर सीएनजी सेडान देखील सबस्क्रिप्शन मॉडेलवर उपलब्ध करून दिली आहे. मारुती सुझुकीने म्हटले आहे की, डिझायर सीएनजी मॉडेलसाठी मासिक सब्सक्रिप्शन फी 16,999 रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी डिझायर सीएनजी त्याच्या सेगमेंटमधील ह्युंदाई ऑरा सीएनजी आणि टाटा टिगोर सीएनजी सारख्या कारशी स्पर्धा करेल. याशिवाय, मारुती सुझुकी डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट ऑटोमेकरच्या इतर सीएनजी कारच्या यादीत सामील झाले आहे, ज्यात सेलेरियो, वॅगनआर सारख्या कारचा समावेश आहे. या सीएनजी सेडानच्या लॉन्चसोबत मारुती सुझुकीच्या सीएनजी पोर्टफोलिओमध्ये एकूण नऊ सीएनजी कार आहेत.

मारुती सुझुकीचा दावा आहे की, डिझायर सेडानचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करणे, हे तेल आयात कमी करण्याच्या आणि भारताच्या प्राथमिक ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा 2030 पर्यंत 6.2 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हे स्वच्छ आणि हिरवे इंधन मानले जाते. तसेच, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलपेक्षा चांगले मायलेज देते. त्यामुळे सीएनजी हा कार मालकांसाठी अधिक किफायतशीर पर्याय ठरतो.

इतर फीचर्सडिझाईनच्या बाबतीत डिझायर सीएनजी पेट्रोल इंजिन व्हेरिएंट प्रमाणेच आहे. यामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे बूट स्टोरेजमध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट सामील आहे. सीएनजी किट 1.2-लीटर K-Series ड्युअल-जेट ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह कार्य करते. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये आहे आणि 6,000 rpm वर 77 PS पॉवर आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच मारुती सुझुकी डिझायर सीएनजी कार 31.12 kmpl चा मायलेज देते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन