Maruti Suzuki Eeco : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) तिच्या किफायतशीर, कमी देखभाल खर्च आणि चांगल्या मायलेज कारसाठी ओळखली जाते. हा देशातील सर्वात लोकप्रिय कार ब्रँड आहे. कंपनीने बाजारात जवळजवळ प्रत्येक सेगमेंटमध्ये आपली वाहने सादर केली आहेत. मग ती हॅचबॅक असो किंवा सेडान, एसयूव्ही, एमपीव्ही प्रत्येक श्रेणीत मारुतीच्या कार्स उपलब्ध आहेत. अन्य कंपन्या या सर्व विभागांमध्ये कंपनीला स्पर्धा देतात. परंतु परंतु एक विभाग असा आहे ज्यामध्ये मारुती सुझुकीचं वर्चस्व आहे. आम्ही 'VAN' सेगमेंटबाबत सांगत आहोत. या श्रेणीतील केवळ एका कारसह, कंपनीनं जवळपास 94 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.
मारुती सुझुकीची प्रसिद्ध व्हॅन मारुती ईकोने नुकताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी ईकोने विक्रीच्या बाबतीत दहा लाख युनिट्सचा आकडा पार केला. ही कार पहिल्यांदा 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि तेव्हापासून या कारच्या 10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे, जी अद्यापही सुरूच आहे. आकडेवारी पाहता, जेव्हा ही कार 2010 मध्ये पहिल्यांदा लाँच झाली तेव्हा पहिल्या 5 युनिट्सच्या विक्रीचा आकडा ओलांडण्यासाठी जवळपास 8 वर्षे लागली. दुसरीकडे, कंपनीने पुढील 3 वर्षांत केवळ 5 लाख युनिट्सचा आकडा पूर्ण केला.
गेल्या फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारीनुसार टॉप10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये एकूण 7 कार मारुती सुझुकीच्या आहेत, त्यापैकी मारुती Eeco देखील आहे आणि ती आठव्या स्थानावर आहे. विक्रीच्या बाबतीत या कारने टाटा पंच आणि ह्युंदाई क्रेटालाही मागे टाकले होते. मारुती Eeco 5-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये एकूण 13 व्हेरिअंटमध्ये उपलब्धआहे. यात कार्गो, अॅम्ब्युलन्स आणि टूरर व्हेरियंटचा समावेश आहे. मारुती सुझुकीने Eeco १३ वर्षांपूर्वी बाजारात लाँच केली होती आणि तेव्हापासून या कारने बाजारात आपलं वर्चस्व निर्माण केलेय. मारुती ईको नेहमीच त्याच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर राहिली आहे आणि त्याचा व्यावसायिक वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.अपडेटेड मॉडेल लाँचमारुती सुझुकी इंडियाने नुकतेच आपल्या प्रसिद्ध MPV कार मारुती Eeco चे नवीन अपडेटेड मॉडेल देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.25 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. नवीन मारुती ईको कंपनीने नवीन इंटीरियर आणि ॲडव्हान्स्ड फीचर्ससह ही कार सादर केली आहे. या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे K-Series Dual-Jet VVT पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते.
काय आहेत फीचर्स?या कारमध्ये कंपनीने रिक्लिनिंग फ्रंट सीट, केबिन एअर फिल्टर, डोम लॅम्प आणि नवीन बॅटरी सेव्हिंग फंक्शन समाविष्ट केले आहे. याशिवाय या कारमधील सेफ्टी फीचर्समध्ये सुधारणा करत 11 सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये इल्युमिनेटेड हजार्ड लाईट, ड्युअल एअरबॅग्ज, इंजिन इमोबिलायझर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), चाइल्ड लॉक, स्लाइडिंग डोअर्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इत्यादी उपलब्ध आहेत.किती आहे मायलेज?ही कार यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत 25 टक्के अधिक मायलेज देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. पेट्रोल मोडमध्ये ही कार 19.71 kmpl पर्यंत मायलेज देते. तर CNG मध्ये ही कार 26.78 kmpl मायलेज देते.