शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

Maruti Suzuki Eeco : फक्त 5.25 लाख रुपये किंमत अन् 26Km चे मायलेज; Eeco ने पार केला 10 लाखांचा टप्पा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 5:18 PM

Maruti Suzuki Eeco : मारुती सुझुकीच्या सर्वात स्वस्त 7-सीटर कारने विक्रीच्या बाबतीत इतिहास रचला आहे. जाणून घ्या गाडीचे फीचर्स...

Maruti Suzuki Eeco : मारुती सुझुकीच्या प्रसिद्ध मारुती ईकोने (Maruti Eeco) आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी इकोने विक्रीच्या बाबतीत 10 लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे. कंपनीने आज जाहीर केले आहे की, ही कार पहिल्यांदा 2010 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि तेव्हापासून या कारचे 10 लाख युनिट्स विकले गेले आहेत. मारुती ईको 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असून, कार्गो, अॅम्ब्युलन्स आणि टूरर व्हेरियंटसह 13 कॉन्फिगरेशनमध्ये येते.

मारुती सुझुकी Eeco कंपनीने तेरा वर्षांपूर्वी बाजारात लॉन्च केली होती आणि तेव्हापासून या कारने बाजारात आपली एक वेगळीच पकड बनवली आहे. मारुती ईको नेहमीच त्याच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर राहिली आहे. या गाडीचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होतो. तुम्ही आकडे बघितले तर, मारुती Eeco चा त्याच्या सेगमेंटमध्ये 94 टक्के मार्केट शेअर आहे. किफायतशीर कौटुंबिक कारपासून ते डिलिव्हरी व्हॅनपर्यंत, ही कार जवळजवळ प्रत्येक बाबीमध्ये वापरली जाते. 2010 मध्ये जेव्हा ही कार पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली, तेव्हा पहिल्या 5 युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार करण्यासाठी तिला जवळपास 8 वर्षे लागली. दुसरीकडे, कंपनीने पुढील 3 वर्षांत 5 लाख युनिट्सचा आकडा पूर्ण केला.

किंमत आणि मायलेजमारुती Eeco 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत रु. 5.25 लाख ते रु. 6.51 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून, ते 81PS पॉवर आणि 104.4Nm टॉर्क जनरेट करते. याचे एक CNG व्हर्जन आहे, जे 72PS आणि 95Nm निर्मित करतो. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार पेट्रोलवर 19.71 kmpl आणि CNG वर 26.78 kmpl मायलेज देऊ शकते.

फीचर्समारुतीने ईकोमध्ये रिक्लायनिंग फ्रंट सीट, केबिन एअर फिल्टर, डोम लँप आणि नवीन बॅटरी सेव्हिंग फंक्शन दिले आहे. याशिवाय कारमध्ये 11 सेफ्टी फीचर्स असतील, ज्यात इल्युमिनिटेड हेजार्ड लाइट, ड्युअल एअरबॅग, इंजिन इमोबिलायजर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), चाइल्ड लॉक, स्लायडिंग डोर, रिवर्स पार्किंग सेंसर इत्यादि मिळतात. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार