मारुतीची सर्वाधिक खपाची एमपीव्ही अर्टिगाची मागणी काही कमी होत नाहीय. अनेक ठिकाणी ११-१२ महिन्यांचा वेटिंग पिरिएड आहे. यामुळे एवढा काळ थांबले तरी लोकांना दरवाढीचा फटका बसत आहे. मारुतीने आपल्या ताफ्यातील दोन कारच्या किंमती वाढविल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ग्राहकांना खिसा आणखी रिकामा करावा लागण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकीने बेस्ट सेलिंग सात सीटर कार MPV Ertiga आणि स्पोर्टी हॅचबॅक इग्निसच्या किंमती वाढविल्या आहेत. या नव्या किंमती याच महिन्यापासून लागू होणार आहेत. आरडीई इंजिन अपडेट केल्याने ही दरवाढ गरजेची होती. अर्टिगाच्या किंमतीत १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मॉडेलनुसार करण्यात आली आहे.
नव्या दरवाढीनुसार तुम्हाला बेस व्हेरिअंटसाठी 8.64 लाख (एक्स-शोरूम) रुपये मोजावे लागणार आहेत. तर टॉप एंड व्हेरिअंटसाठी तुम्हाला 13.08 लाख (एक्स-शोरूम) मोजावे लागणार आहेत. अर्टिगामध्ये के-सीरीज़ 1.5-लीटर ड्युअल व्हीव्हीटी इंजिन देण्यात आले आहे. ही कार पॅडल शिफ्टर्ससोबतही मिळते.
तर इग्निसच्या किंमतीत मारुतीने २००० रुपयांची वाढ केली आहे. स्पोर्टी हॅचबॅकची किंमत आता अब 5.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरु होते. तर टॉप एंड व्हेरिअंटची किंमत 8.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे.