नवी दिल्ली : मारुती सुझुकीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत Ertiga MPV ची एक्स-शोरूम किंमत 6,000 रुपयांनी वाढवली आहे. कंपनीने स्टॉक नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, मारुती सुझुकी एर्टिगा एमपीव्हीची किंमत आता 8.41 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असणार आहे. कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे की, Ertiga च्या सर्व सध्याच्या व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किंमतीत 6,000 रुपयांनी वाढ झाली आहे. Ertiga ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8,41,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असेल.
किमतीच्या वाढीव्यतिरिक्त, मारुती सुझुकी एर्टिगाला हिल होल्ड असिस्ट आणि ईएसपी सारख्या काही स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स देखील ऑफर करण्यात आली आहेत. याआधी हे फीचर्स फक्त टॉप-स्पेक व्हेरिएंट ZXi+ MT आणि AT मध्ये उपलब्ध होते. नवीन मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी नवीन क्रोम-फिनिश ग्रिल, 15-इंच अलॉय व्हील आणि फॉग लॅम्पसह येते. यामध्ये वायपर/वॉशर आणि एलईडी टेल-लॅम्प आहे.
इंटिरियर्सबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी ग्राहकांना पुश स्टार्ट/स्टॉप बटण, फ्रेश सीट अपहोल्स्ट्री आणि अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोसह नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. इतर अपडेटमध्ये कलर्ड TFT MID स्क्रीन समाविष्ट आहे, जी सीएनजी-टू-फ्यूल रेश्यो तपासण्यासाठी वापरली जाते.
इंजिन आणि पॉवरनवीन एर्टिगा सीएनजीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 1.5-लीटर K15C DualJet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे पूर्णपणे 87 hp ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. पेट्रोल मोडमध्ये ते 100 एचपी पॉवर जनरेट करते. मारुती सुझुकी एर्टिगा पेट्रोल मोडमध्ये सुरू होते आणि इंजिन आदर्श तापमानावर पोहोचल्यानंतर ते सीएनजीमध्ये कनव्हर्ट होते. एमपीव्ही सीएनजी मोडमध्ये 15.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते. तर पेट्रोल मोडमध्ये 13.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते. मारुती सुझुकीचा दावा आहे की, नवीन एर्टिगा सीएनजी 26.11 km/kg चीफ्यूल एफीशियन्सी ऑफर करते.