नवी दिल्ली : दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी फेब्रुवारीच्या अखेरीस आपली 2022 बलेनो प्रीमियम हॅचबॅक लॉन्च करण्याची शक्यता आहे. कंपनी अनेक नवीन फीचर्ससह ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात खास फीचर पाहायला मिळेल, ते म्हणजे यामध्ये पहिल्यांच मिळणारे 360 व्ह्यू कॅमेरा फीचर आहे, ज्यामुळे ड्रायव्हरला कार चालवणे अतिशय सोयीचे होणार आहे.
मारुतीने या महिन्यात लॉन्च होणार्या 2022 बलेनो प्रीमियम हॅचबॅकमध्ये 360-व्ह्यू कॅमेरा इन्स्टॉल केला आहे. 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट प्रीमियम हॅचबॅक 360 व्ह्यू कॅमेऱ्यासाठी सज्ज आहे, जे ड्रायव्हर्सना कार चालविण्यास खूप मदत करेल. बाजारात उपलब्ध असलेल्या मारुतीच्या कोणत्याही कारमध्ये हे फिचर पहिल्यांदाच जोडले जात आहे.
कंपनीने अलीकडेच या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होण्यापूर्वी फीचरला टीज केले होते. 360 व्ह्यू कॅमेरा 2022 बलेनोचे सभोवतालचे दृश्य दाखवेल. तसेच, हा कॅमेरा फक्त ड्रायव्हर्सना कठिण जागेत कार पार्क करण्यास मदत करत नाही, तर ब्लाइंड स्पॉट्समध्ये अडथळे टाळण्यास देखील मदत करेल.
360 व्ह्यू कॅमेरा 2022 बलेनोचे सभोवतालचे दृश्य देईल, जे ड्रायव्हर्सना फक्त अरुंद जागेत कार पार्क करण्यास मदत करेल असे नाही तर गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या समस्या टाळण्यास देखील मदत करेल. 360 व्ह्यू कॅमेरा व्यतिरिक्त, 2022 बलेनो हेड अप डिस्प्ले (HUD) स्क्रीनसह येईल, जे सेगमेंटमधील कोणत्याही ब्रँडच्या कारसाठी नवीनच आहे.
बलेनोला इन्फोटेनमेंट सिस्टीमच्या रूपात अपडेटेड 9-इंच एचडी स्क्रीन देखील मिळेल. नवीन व्हर्जनच्या मारुतीच्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या गाड्यांपेक्षा हे खूपच वेगळे आहे. मारुती ARKAMYS द्वारे संचालित Surround Sense देखील ऑफर करेल, जे नवीन बलेनोमधील प्रवाशांच्या आसनाला एक सुखद अनुभूती देईल.
इंजिन आणि मायलेज2022 मारुती बलेनो फेसलिफ्ट सध्याच्या मॉडेलमध्ये देऊ केलेल्या पॉवरट्रेनसह येण्याची शक्यता आहे. कार नेहमीच्या 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येईल, जी 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांशी जुळलेली आहे. पॉवर आउटपुटमध्ये किंचित बदल होण्याची शक्यता असताना, नवीन बलेनो अधिक चांगले मायलेज देईल अशी अपेक्षा आहे. 2015 मध्ये लाँच झाल्यापासून बलेनो प्रीमियम हॅचबॅक मारुती सुझुकीसाठी स्टार परफॉर्मर्सपैकी एक आहे. आत्तापर्यंत मारुतीने 10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. मारुतीने 2022 बलेनोचे अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच बुकिंग सुरू केले आहे.