मारुती सुझुकीने व्हायब्रंट गुजरात इव्हेंटमध्ये अपडेटेड eVX चा प्रोटोटाइप आणि फ्लाइंग कारची कॉन्सेप्ट सादर केली आहे. या फ्लाइंगच्या कॉन्सेप्टमधून असे दिसून येते की, येत्या काळात देशात फ्लाइंग कारची सेवा सुरू होईल. मारुती सुझुकी या फ्लाइंग कारसाठी स्कायड्राईव्ह या जपानी कंपनीसोबत भागीदारी करत आहे.
आगामी स्कायकार हे एक मल्टी-रोटर एअरक्राफ्ट आहे, जे फ्लाइंग कारप्रमाणे वापरण्यासाठी भारतात तयार केले जाणार आहे. स्कायकार फ्लाइंग टॅक्सी ही कॉन्सेप्ट विशेषत: ज्या शहरी भागात विमानतळ बांधणे कठीण आहे, त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. व्हायब्रंट गुजरात इव्हेंटमध्ये सादर केलेला हा प्रोटोटाइप इमारतींच्या छतावर उतरू शकतो. अशा फ्लाइंग कारच्या आगमनाने वाहतूक आणि वाहतुकीचा प्रश्नही सुटण्याची अपेक्षा आहे.
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार!eVX बद्दल बोलायचे झाले तर ही कंपनीची इलेक्ट्रिक कार आहे, जी या वर्षानंतर लाँच होईल. जुन्या मॉडेलच्या तुलनेत कारच्या अपडेटेड प्रोटोटाइप मॉडेलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, पूर्वीचे EVX मॉडेल ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आले होते. या ईव्हीचे उत्पादन तयार आहे. या कारची साईज ग्रँड विटारा सारखी असेल. म्हणजेच ही इलेक्ट्रिक कार 4300mm लांब असणार आहे.
याचबरोबर, कार इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर बनवलेले असल्याने, त्याचा व्हीलबेस सुमारे 2700mm असणार आहे. म्हणजे कारला केबिनमध्ये चांगली जागा मिळेल. eVX ही मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल, ती 60kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह देण्यात येणार आहे. एकदा फुल चार्ज झाल्यावर, ही इलेक्ट्रिक कार 550 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.