शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maruti Fronx CNG: स्पोर्टी स्टाइल...जबरदस्त मायलेज आणि स्वस्त! येतेय Maruti ची नवी सीएनजी SUV

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:47 PM

मारुती सुझुकीनं ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवी कॉम्पॅक्ट SUV Maruti Fronx सादर केली होती.

नवी दिल्ली-

मारुती सुझुकीनं ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवी कॉम्पॅक्ट SUV Maruti Fronx सादर केली होती. याच दरम्यान या कारसाठीची बुकिंग देखील अधिकृतरित्या सुरू करण्यात आली होती. इच्छुकांना कंपनीच्या वेबसाइट आणि NEXA डीलरशीपच्या माध्यमातून कार बूक करता येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या एसयूव्ही कारचं आता CNG व्हर्जन देखील बाजारात येणार आहे. सीएनजी वाहनांवर मारुतीनं भर दिला आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमधील जवळपास सर्व गाड्यांचे सीएनजी व्हर्जन उपलब्ध आहेत. नुकतंच Maruti Fronx CNG व्हर्जन टेस्टिंग दरम्यान दिसून आलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार Maruti Fronx कार इमिशन टेस्टिंग इक्युपमेंटसह दिसून आली आहे. यावरुनच कंपनी या कारचं CNG मॉडल बाजारात आणणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. कंपनी एप्रिल महिन्यापासून या कारची विक्री करणार असल्याचं बोललं जात आहे. डीझल इंजिन ऐवजी कंपनी आता रेग्युलर पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजी मॉडलसर इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रीत करत आहे. बाजारात दाखल झाल्यानंतर नेक्सा डीलरशीपद्वारे विक्री केली जाणारी ही चौथी CNG कार ठरणार आहे. 

काय असतील फिचर्स?Fronx Delta व्हेरिअंटमध्ये कंपनी काही खास फिचर्स देणार आहे. जे मिड रेंजच्या तुलनेत अत्यंत उपयुक्त असणार आहेत. या व्हेरिअंटमध्ये 7.0 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, स्मार्टप्ले प्रो इन्फोटेन्मेंट सिस्टम, व्हाइस असिस्टंट फीचर, ओवर-द-एअर अपडेट,  4-स्पीकर साऊंड सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल विंग मिरर आणि स्टिअरिंग व्हील माऊंडेट कंट्रोल इत्यादी फिचर्स ऑफर करण्यात येणार आहेत. 

किंमत आणि मायलेज किती?लॉन्चआधीच या कारच्या किमतीबाबत अधिकृत माहिती देणं खूपच कठीण आहे. पण कंपनी या कारची किंमत ८ ते ११ लाख रुपयांच्या घरात ठेवण्याची दाट शक्यता आहे. मारुतीच्या इतर मॉडल प्रमाणे याही कारमध्ये सीएनजी व्हेरिअंटची किंमत रेग्युलर पेट्रोल व्हेरिअंटच्या तुलनेत १ लाख रुपयांनी महाग असू शकतं. मायलेजबाबत बोलायचं झालं तर १.२ लीटर पेट्रोल इंजीन सीएनजी लाइनअप जवळपास ३० किमी प्रतिकिलोग्रॅमचं मायलेज देतं. त्यामुळे नवी Fronx CNG देखील याच जवळपास मायलेज देईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी