मारुती सुझुकीने ब्रेझाला नवीन कनेक्टिव्हिटी फीचर्ससह अपडेट केले आहे. SmartPlay Pro+ इन्फोटेनमेंट सिस्टीम आता वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि वायरलेस Apple CarPlay सह अपडेट करण्यात आली आहे. हेड-अप डिस्प्ले आणि मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्लेसाठी टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील देण्यात आलेय. नवे फीचर्स स्मार्टफोन अपडेटच्या माध्यमातून अप ओटीएच्या रुपात सहजरित्या इन्स्टॉल केले जाऊ शकतात किंवा वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकतात अशी माहिती कंपनीकडून देण्यात आलीये.
मारुती सुझुकी ब्रेझा 30 जून 2022 रोजी लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 1.9 लाखांहून अधिक बुकिंग्स झाल्या आहेत. मारुतीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्री-जनरल एसयूव्ही विटारा ब्रेझा भारतीय बाजारपेठेत हिट ठरली. त्यानंतर कंपनीने या वर्षी मारुती सुझुकी ब्रेझा आणि ग्रँड विटारा या दोन नवीन एसयूव्ही लाँच केल्या. त्यालाही भारतीय बाजारपेठेत खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अनेक जबरदस्त फीचर्सफीचर्सच्या बाबतीत, Brezza ला आता बरेच अपडेट केले गेले आहे. यात इलेक्ट्रॉनिक सनरूफ, Arkamys साउंड सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, मारुती सुझुकी 360-डिग्री पार्किंग कॅमेरा देखील ऑफर करते. कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सर्व एलईडी लाइटिंग, एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक वायरलेस चार्जर, एक कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रिअर एसी व्हेंट्स, कीलेस एंट्री आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम मिळते. यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीदेखील आहे, ज्याला "सुझुकी कनेक्ट" म्हटले जाते.
मेकॅनिकली अपडेट नाहीमारुती सुझुकीने ब्रेझाला मेकॅनिकली कोणतेही अपडेट दिलेले नाही. यात 1.5-लिटर K15C इंजिनसह देण्यात आले आहे. तसंच ते स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे 6,000rpm वर 102bhp कमाल पॉवर आणि 4,400rpm वर 136.8Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आले आहेत.
किती आहे किंमत?मारुती सुझुकी ब्रेझा चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi+ व्हेरिअंट्सचा समावेश आहे. बेस LXI ट्रिम वगळता सर्व व्हेरिअंट्समध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन ऑफर केले जाते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 13.80 लाख रुपयांपर्यंत जाते.