मारुती सुझुकी सेप्टेंबर 2022 मध्ये बहुप्रतीक्षित ग्रँड विटारा एसयूव्ही लॉन्च करणार आहे. या एसयूव्हीचे प्रोडक्शन कर्नाटकातील बिदादीमधील टोयोटाच्या प्रोडक्शन फॅसिलिटीमध्ये सुरूही झाले आहे. यातच, माध्यमांतील वृत्तांनुसार, ग्रँड विटाराला लॉन्च होण्यापूर्वीच 40,000 हून अधिक बुकिंग मिळाली आहे. नव्या मॉडेलची डिलिव्हरी पुढील महिन्यात सुरू होईल.
संबंधित वृत्तांत दावा करण्यात आला आहे, की मारुती सुझुकीकडे 3,87,000 युनिटचा डिलिव्हरी बॅकलॉग आहे. कंपनीने अद्याप नव्या बलेनो हॅचबॅकच्या 38,000 युनिट्सची डिलिव्हरी केलेली नाही. लॉन्च करण्यात आलेल्या नव्या मारुती ब्रेझाच्याही 30,000 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी अद्याप बाकी असल्याचे समजते. अशातच नव्या ग्रँड विटाराची 40 हजार बुकिंग देखील आली आहे.
नव्या मारुती ग्रँड विटाराची किंमत 9.50 लाख रुपयांपासून ते 18 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. ही एसयूव्ही माइल्ड हायब्रिड आणि स्ट्रॉन्ग हायब्रिड पॉवरट्रेनसह लॉन्च केली जाणार आहे. एसयूव्ही 6 ट्रिम्स लेव्हल- सिग्मा, डेल्टा, जेटा, अल्फा, जेटा प्लस हायब्रिड आणि अल्फा प्लस हायब्रिडमध्ये येईल. ही कार 9 रंगांमध्ये, 6 मोनोटोन आणि 3 डुअल-टोनमध्ये असेल. मारुती ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च केली जाईल. एक ऑप्शन स्मार्ट हायब्रिड सिस्टिमसह 1.5L K15C डुअल-जेट पेट्रोल इंजिन असेल आणि दुसरे ऑप्शन इंटेलिजन्ट हायब्रिड टेकसह 1.5L TNGA पेट्रोल इंजिनचे असेल.
स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हर्जनमध्ये टोयोटाकडून घेण्यात आलेले 3-सिलेंडर 1.5L TNGA एटकिंसन सायकल इंजिन असेल. यात 177.6V लिथियम-आयर्न बॅटरी देखील असेल. इंजिन 92.45PS पॉवर जनरेट करू शकेल. तर हायब्रिड मोडवर 115.5PS आणि 122Nm आउटपूट मिळू शकेल. हे टोयोटाच्या ई-सीव्हीटीसह येईल. स्ट्राँग हायब्रिड व्हेरिअंटमध्ये 27.97kmpl ची ARAI प्रमाणित इंधन कार्यक्षमताही उपलब्ध असेल.