Maruti Suzuki Jimni: सध्या मार्केटमध्ये Mahindra कंपनीच्या Tharला लोकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. पण, लवकरच या थारला टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki Jimny बाजारात येणार आहे. मारुतीने या जिम्नीला गेल्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केले होते. तेव्हापासून याच्या भारतात लॉन्चिंगची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Jimny ला भारतात 5 गेट्ससोबत सादर केले जाईल. सध्या एका भारतीय व्यक्तीने परदेशातून ही गाडी आयात केली असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तीन दरवाजे असलेली जिम्नी दिसत आहे, हे व्हर्जनदेखील अतिशय आकर्षक दिसत आहे. भारतीय बाजारात येणाऱ्या जिम्नीमध्ये 5 दरवाजे असण्याची अपेक्षा आहे.
जिम्नीमध्ये रग्ड ग्रिल डिझाइन आणि गोल हेडलँप असतील. याचे डिझाइन काहीशे जिप्सीप्रमाणे आहे. या जिम्नीमध्ये मोठ्या आकाराचे व्हील मिळतील. ही एखादी सामान्य कॉम्पॅक्ट SUV नसून, याचा यात '2डब्ल्यूडी-हाय', '4डब्ल्यूडी-हाय' आणि '4डब्ल्यूडी-लो' मोड देण्यात आले आहेत. यात अप्रोच/ब्रेकओवर अँगलसह 210 मिमीचा ग्राउंड क्लिअरेंस मिळतो. ही गाडी सामान्य रोडसोबतच ऑफ-रोडसाठी बनवण्यात येणार आहे.
जुनी जिप्सी एक आयकॉन होती आणि नेहमी राहील. भारतीय सैन्यात या गाडीचा मोठा वापर होतो, पण Civilian Version अनेक दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. आता ऑटो एक्सोमध्ये या गाडीची झलक दिसल्यामुळे, भारतात याच्या लॉन्चिंगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतात कधी लॉन्च होणार, किंमत काय असणार, मायलेज काय असणार याबाबत अद्याप कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही.