नवी दिल्ली : सध्या जर एखादी छोटी कार घ्यायची असेल तर सर्वात पहिल्यांदा लोकांच्या मनात येते ती म्हणजे मारुती सुझुकीच्याकार. दुसरीकडे, जेव्हा एसयूव्हीचा विचार केला जातो, तेव्हा पहिले लक्ष महिंद्राच्या कारवर जाते, परंतु आता या दोघांमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे. कारण, सुझुकी लवकरच भारतात 5- डोअर एसयूव्ही लाँच करणार आहे, जी थेट महिंद्रा थारसोबत (Mahindra Thar) स्पर्धा करु शकते.
सुझुकीची एसयूव्ही सुझुकी जिमनी (Suzuki Jimny) आता भारतीय बाजारपेठेत प्रत्यक्षात उतरणार आहे. ही एसयूव्ही जागतिक बाजारपेठेत पहिल्यांदाच लाँग व्हीलबेससह आणि नंतर शॉर्ट व्हीलबेससह भारतात लॉन्च करण्याची योजना आहे. लोक या कारची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत आणि अलीकडेच भारतातील रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान ती दिसून आली आहे. मात्र, मारुती सुझुकीने भारतात लॉन्च करण्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
लूकच्या बाबतीत, सुझुकी जिमनी ही एसयूव्ही महिंद्र अँड महिंद्राच्या थारला टक्कर देईल. तसेच, ही कार देखील खूप स्पेशियस आहे. या कारला एक 3- डोअर व्हर्जन देखील आहे. भारतात दिसलेली सुझुकी जिमनी कदाचित कोमुफ्लाझने झाकलेली असेल, परंतु तरीही त्याबद्दल काही गोष्टी ज्ञात आहेत. जसे की कारच्या खिडक्या सामान्य गाड्यांपेक्षा किंचित मोठ्या असतील.
याचबरोबर, या एसयूव्हीच्या मागील डोअरवर स्टेपनी देखील असेल. मात्र, फायनल लॉन्चच्यावेळी, ही स्टेपनी कारच्या आत देखील बसविली जाऊ शकते. सुझुकीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये पहिल्यांदाच या एसयूव्हीची झलक दाखवली होती. हे शक्य आहे की कंपनी या कारमध्ये हेड अप डिस्प्ले, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा यासारखे अनेक लेटेस्ट फीचर्स देईल, जे कंपनीने अलीकडेच आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती ब्रेझामध्ये दिले आहेत.