शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

Maruti Suzuki Jimny खरेदीवर 1.5 लाखांपर्यंत सूट, Baleno-Fronx वर सुद्धा मोठा डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 5:19 PM

ऑफ-रोड एसयूव्ही मारुती जिम्नी, प्रीमियम हॅचबॅक बलेनो, फ्रॉन्क्स आणि ग्रँड विटारा यासारख्या एसयूव्हीचा समावेश आहे.

नवी दिल्ली : मारुती सुझुकीच्या नेक्सा डीलरशिपद्वारे विकल्या जाणाऱ्या कारवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी जानेवारी 2024 मध्ये निवडक कारवर डिस्काउंट देत आहे. यामध्ये ऑफ-रोड एसयूव्ही मारुती जिम्नी, प्रीमियम हॅचबॅक बलेनो, फ्रॉन्क्स आणि ग्रँड विटारा यासारख्या एसयूव्हीचा समावेश आहे. 2023 मॉडेल्सवर अधिक डिस्काउंट दिला जात आहे, तर 2024 मॉडेल्सवर कमी डिस्काउंट दिला जात आहे. 

मागील महिन्यांप्रमाणे, मारुती सुझुकीच्या नेक्सा लाइनअपच्या कारवर डिस्काउंट दिला जात आहे. मारुती सुझुकी जिम्नीवर सर्वात मोठा डिस्काउंट मिळणार आहे. मात्र, नवीन जिम्नी खरेदीवर यावेळी कमी डिस्काउंट मिळत आहे. ऑटो कंपनीने या महिन्यात डिस्काउंटची रक्कम कमी केली आहे. तर जाणून घ्या या जानेवारी महिण्यात किती डिस्काउंट मिळणार?

Maruti Suzuki Discount Offers: 1.55 लाखांपर्यंत डिस्काउंट!

Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी जिम्नीच्या अल्फा व्हेरिएंटवर सर्वाधिक 1.55 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. Zeta व्हेरिएंट खरेदीवर तुम्हाला 55,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. 2024 मॉडेल जिम्नी खरेदी करून तुम्ही 5,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Maruti Suzuki Ignis: मारुती सुझुकी इग्निसच्या मॅन्युअल व्हर्जनवर 62,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 52,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. 2024 च्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 52,000 रुपये तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 47,000 रुपयांपर्यंतची बचत होईल.

Maruti Suzuki Ciaz: मारुतीच्या मिडसाईज सियाझवर 55,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. ही ऑफर 2023 मॉडेल्सवर मिळू शकते. कंपनी 2024 मॉडेल्सवर 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

Maruti Suzuki Baleno: भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कारपैकी एक बलेनोच्या 2023 मॉडेलवर 47,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सीएनजी व्हेरिएंटवर 32,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. 2024 मॉडेल्स खरेदी केल्यावर तुम्हाला 32,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.

Maruti Grand Vitara: मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटसह विकली जात आहे. 2024 मॉडेल ग्रँड विटारा खरेदी करून 20,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. ही एसयूव्ही माइल्ड हायब्रिड, हायब्रीड आणि सीएनजी इंजिनसह येते.

Maruti Suzuki Fronx: 2023 मध्ये लॉन्च केलेली मारुती सुझुकी फ्रंट खरेदी करण्याचा तुमचा विचार असल्यास, तुम्ही 30,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. मात्र, सीएनजी व्हर्जनवर कोणताही डिस्काउंट दिला जात नाही. टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार