मारुती सुझुकीने सोमवारी एक मोठी घोषणा केली. कंपनीने नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या पहिल्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत. मारुती बलेनो सीएनजी आणि मारुती एक्सएल 6 सीएनजी अशी या दोन्ही कारची नावे आहेत. म्हणजेच आता आपण मारुतीचे प्रीमियम हॅचबॅक बलेनो आणि 7 सीटर कार XL6 चे CNG व्हर्जन खरेदी करू शकता. सीएनजीची वाढती लोकप्रियता लक्षात घेत, अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
अशी आहे किंमत - कंपनीने बलेनो सीएनजीची सुरुवातीची किंमत 8.28 लाख रुपये एवढी ठेवली आहे. ही किंमत गाडीच्या डेल्टा व्हेरिअंटची असेल. तसेच हिच्या टॉप झेटा व्हेरिअंटची किंमत 9.21 लाख रुपये असेल. तर, XL6 CNG केवळ Zeta व्हेरिअंटमध्येच लॉन्च करण्यात आली आहे. हिची किंमत 12.24 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमती) आहे.
या दोन्ही कारसह, मारुतीकडे आता एकूण 12 सीएनजी मॉडेल्स आहेत. याशिवाय, कंपनी आधीच Celerio, WagonR, Alto 800, Dzire, Swift, Ertiga, Eeco सारख्या वाहनांमध्ये CNG ऑफर करत आहे. याच बरोबर कंपनी आपल्या 7 सीटर कार Ertiga मध्ये सीएजनी किट ऑफर करत होती.
इंजिन आणि पॉवर -बलेनो आणि XL6 या दोन्ही कारला नुकतेच अपडेट करण्यात आले आहे. या दोन्ही कारचे एक्सटीरियर बदलण्याबरोबरच कंपनीने फीचर्सची यादीही अपडेट केली होती. यात 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, 9-इंच डिजिटल टचस्क्रीन, अपडेटेड डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आदिंचा समावेश आहे. बलेनो 1.2 लिटर डुअलजेट पेट्रोल इंजिनसह येते. तर XL6 ला 1.5-लिटर K सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.