नवी दिल्ली : ऑटो एक्सपो 2023 मध्ये (Auto Expo 2023) मारुती सुझुकीने पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात आपली पहिली ऑफ-रोड एसयूव्ही मारुती जिम्नी 5 डोअर (Maruti Suzuki Jimny 5 door) लाँच केली आहे. मारुती जिम्नी लाँच करण्यासोबतच कंपनीने आपली बुकिंग विंडो देखील ओपन केली आहे.
Maruti Suzuki Jimny 5 doorमारुती जिम्नी 5 डोअर खरेदी करण्यात स्वारस्य असलेले ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या मारुती सुझुकी डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात. या ऑफ-रोड एसयूव्हीच्या बुकिंगसाठी कंपनीने 11,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे, जी रिफंडेबल आहे.
Maruti Suzuki Jimny 5 door Engineमारुती सुझुकीने जिमनी 5 डोअरमध्ये 4 सिलिंडरसह 1.5 लीटर K-15-B पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 101 bhp पॉवर आणि 130 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. यासोबतच, मारुती सुझुकीने या ऑफ रोड एसयूव्हीमध्ये 4X4 व्हील ड्राइव्हचे फीचरही दिले आहे.
Maruti Suzuki Jimny 5 door Rivalsमारुती सुझुकी जिम्नी 5 डोअरची स्पर्धा या सेगमेंटमध्ये लवकरच लाँच होणाऱ्या महिंद्रा थार 5 डोअरसोबत (Mahindra Thar 5 Door) होणार असल्याचे निश्चित आहे.
Maruti Suzuki Fronx SUVजिम्नी 5 डोअर लाँच करण्यासोबतच मारुती सुझुकीने आपली नवीन प्रीमियम एसयूव्ही मारुती फ्रॉन्क्स देखील अनावरण केली आहे. मारुती सुझुकीने 4 सिलिंडरसह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असलेली ही एसयूव्ही बाजारात आणली आहे. मारुती जिम्नीसोबतच कंपनीने या एसयूव्हीसाठी बुकिंग विंडोही उघडली आहे.
दरम्यान, मारुती सुझुकी आपल्या Maruti Suzuki Fronx SUV ला आपल्या प्रीमियम आउलेट नेक्साद्वारे विक्री करणार आहे. मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेची (Hisashi Takeuchi) यांनी 5 डोअर जिम्नीच्या लाँच इव्हेंटमध्ये सांगितले की, मारुती सुझुकी भारतात पहिल्यांदाच जिम्नी सादर करत आहे, जी 5 डोअरसह लाँच करण्यात आली आहे. या एसयूव्हीला जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे, ज्याचा पुरावा 199 देशांतील सुमारे 32 लाख लोकांनी खरेदी केली आहे.