जर आपण चांगले मायलेज देणारी कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज आम्ही आपल्याला अशा कारसंदर्भात माहिती देत आहोत, ज्या 1 लिटर फ्युअलमध्ये तब्बल 35 ते 40 किलोमीटरपर्यंत मायलेज देतील. आम्ही बोलत आहोत मारुती सुझुकीच्या नव्या पिढीतील मारुती स्विफ्ट आणि डिझायरसंदर्भात. या दोन्ही कार 2024 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केल्या जाऊ शकतात. मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायरचे हायब्रिड व्हर्जन लॉन्च करू शकते.
इंजिनमध्ये होणार बदल -मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पिढीच्या मारुती स्विफ्टला नवे हायब्रीड इंजिन देण्यात येणार आहे. यात ग्राहकांना नवे 1.2 लिटर हायब्रीड 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. Z12E K12C असा या इंजिनचा कोड असेल. हे इंजिन मारुतीच्या अपकमिंग अॅडव्हान्स ट्रिम्ससाठी रिझर्व ठेवण्यात आले होते. साधारणपणे जून-जुलै 2024 पर्यंत या गाड्या नव्या इंजिनसह भारतीय रस्त्यावर धावताना दिसू शकतात.
काय असेल किंमत? -आताच्या ट्रिम्सचा विचार करता, या कारच्या किंमती फार अधिक नसतील असा अंदाज आहे. कारण मारुती आधीच टोयोटाकडून हायब्रीड तंत्रज्ञान घेत आहे. अर्थात या कारना हायब्रिड बनवण्यासाठी फारसा अधिक खर्च येणार नाही. अशा स्थितीत, या कारची संभाव्य किंमत 7.5 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होऊ शकते.
डिझाईनमध्ये होऊ शकतो बदल - सध्याच्या मारुती डिझायरला आणि मारुती स्विफ्टला उत्कृष्ट मायलेज आणि किफायतशीर किमतींमुळे भारतीय बाजारात प्रचंड मागणी आहे. आता या नव्या कार लॉन्च झाल्यानंतर, या गाड्यांची विक्री आणखी वाढू शकते. कंपनी आपल्या या हायब्रिड व्हेरिअंट कारच्या डिझाईनमध्ये स्पोर्टी एलिमेंटचा वापर करू शकते. यांच्या डिझाईनमध्येही काही प्रमाणावर बदल केला जाऊ शकतो.