शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

एरिनानंतर मारुतीने नेक्सावरही जाहीर केली सवलत, बलेनोसह 'या' कारवर मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 12:29 PM

maruti suzuki : कंपनी अल्टो, सेलेरियो आणि वॅगन आर यांसारख्या स्वस्त कार मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी नोव्हेंबरमध्ये आपल्या प्रीमियम नेक्सा मॉडेल्स इग्निस, सियाझ आणि बलेनोवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. दरम्यान, ही सवलत तीन मॉडेल्सपर्यंत मर्यादित आहे आणि नुकत्याच लाँच झालेल्या मारुती सुझुकी XL6 वर कोणतीही सवलत उपलब्ध नाही, परंतु ही सवलत बलेनो सीएनजीवर उपलब्ध आहे.

यापूर्वी मारुती सुझुकीने एरिना लाइनअपच्या गाड्यांवर सूट जाहीर केली होती. कंपनी अल्टो, सेलेरियो आणि वॅगन आर यांसारख्या स्वस्त कार मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, मारुतीने नुकतेच बलेनो आणि XL6 च्या सीएनजी मॉडेल्स लाँच केले आहेत आणि त्यांच्या सीएनजी लाइनअपचा विस्तार केला आहे.

मारुती सुझुकी सियाझमारुती सुझुकी सियाझवरील सवलतींबद्दल बोलायचे झाल्यास, या मिड साइज सेडानच्या सर्व मॅन्युअल व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 30,000 रुपयांची सूट मिळत आहे. मारुती सुझुकी सियाझची भारतातील होंडा सिटी, ह्युंदाई वेर्ना, स्कोडा स्लाव्हिया आणि फोक्सवॅगन व्हर्टससोबत टक्कर होणार आहे. या कारला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरच्या मदतीने 103 bhp आणि 138 Nm टॉर्क बनवते. मारुती सुझुकी सियाझसह 20.6 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

मारुती सुझुकी इग्निसमारुती सुझुकीची सर्वात आलिशान कार इग्निसवर नोव्हेंबरमध्ये सर्वात मोठी सूट मिळत आहे. मारुती सुझुकी इग्निसच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, तर ऑटोमॅटिक मॉडेल्सवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुती सुझुकी इग्निस 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिनसह येते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटीच्या मदतीने 82 बीएचपी आणि 113 एनएम पीक टॉर्क बनवते.

मारुती सुझुकी बलेनोमारुती सुझुकी बलेनोवर पेट्रोलवर तसेच नुकत्याच लाँच झालेल्या सीएमजी मॉडेलवर 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मारुती सुझुकी बलेनोने या वर्षाच्या सुरुवातीला कॉस्मेटिक अपडेट्स आणि अनेक नवीन फीचर्ससह अपडेटेड बलेनो लाँच केली. अपडेटेड बलेनोला अनेक टेक्निकल अपडेट मिळाले आहेत, जसे की एचयूडी युनिट आणि कनेक्टेड कार टेक, ज्यामुळे युजर्सला स्मार्टवॉचद्वारे देखील कार स्टार्ट करता येऊ शकते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग