नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय बाजारपेठेत मारुती अरेना आणि मारुती नेक्सा शोरूमद्वारे आपल्या कारची विक्री करते. कंपनी नेक्सा शोरूमवर ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स देत आहे. नेक्सा शोरूमद्वारे कंपनी आपल्या प्रीमियम कारची विक्री करते, यामध्ये Ignis, Baleno, Ciaz, s-cross आणि XL6 सारख्या कारचा समावेश आहे. या ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना 40 हजारांपर्यंत सूट मिळू शकते.
जर तुम्हालाही मारुती सुझुकीच्या कार आवडत असतील आणि नवीन कार घेण्याचा विचार करत असाल. तर आम्ही तुम्हाला मारुती कारवर मिळणाऱ्या सर्व ऑफर्सबद्दल माहिती देत आहोत. कंपनीची ही ऑफर फक्त जानेवारी 2022 साठी आहे.
Maruti Suzuki S-CrossS-Cross ही मारुती सुझुकीची भारतीय बाजारपेठेत अतिशय लोकप्रिय कार आहे. कंपनी सध्या यावर 15,000 रुपयांची कॅश डिस्काउंट देत आहे. 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. 5,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. S-Cross ची किंमत 8.59 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.4 लाख रुपयांपर्यंत जाते.
Maruti Suzuki IgnisMaruti Suzuki Ignis ही बाजारपेठेतील लोकप्रिय कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे. या महिन्यात कॉम्पॅक्ट अर्बन एसयूव्हीवर 5,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. याशिवाय, कंपनी यावर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनससह 2,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.1 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7.47 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Maruti Suzuki Balenoमारुती सुझुकी प्रीमियम हॅचबॅक बलेनोवर 10,000 रुपयांची रोख सूट देत आहे. याशिवाय, कंपनी 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीसाठी बलेनोला मोठे यश मिळाले आहे. या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.97 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 9.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Maruti Suzuki Ciazमारुती सुझुकी सध्या त्यांच्या एकमेव फुल साइज सेडान Ciaz वर कोणतीही रोख सवलत देत नाही. मात्र, सेडानमध्ये 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे, जी कार खरेदीसह समाविष्ट आहे. Ciaz सुद्धा कंपनीसाठी सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांपैकी एक आहे.