देशात एसयूव्ही कारची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या स्वस्तातील आणि छोट्या कारलादेखील एसयूव्ही सारखा लुक देण्याचा प्रयत्न करत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ ही भारतीय बाजारातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. जी तिच्या जबरदस्त लुकसाठी ओळखली जाते. मात्र हिची सुरुवातीची किंमत 12 लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे ही गाडी सर्वांच्या खिशाला परवडणारी नाही. मात्र आम्ही आपल्याला एका अशा कार संदर्भात माहिती देत आहोत, जी केवळ 4 लाख रुपयांतच आपल्याला महिंद्रा स्कार्पिओ सारखा लुक देईल.
ज्या कारसंदर्भात आम्ही बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे, मारुती एस्प्रेसो (Maruti Spresso). महत्वाचे म्हणजे, कंपनीने ही कार नुकतीच ब्लॅक कलर अॅडिशनमध्ये सादर केली आहे. हिच्या फ्रंट लुकपासून ते व्हीलच्या डिझाइनपर्यंतच्या बऱ्याचशा गोष्टी स्कॉर्पिओ क्लासिकप्रमाणे दिसतात. ही कार भलेही साईजने छोटी असेल, पण कंपनीने हिला एक बॉक्सी आणि स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही कार आपल्याला पहिल्या नजरेत मिनी स्कॉर्पियो सारखी वाटू शकते.
इंजिन आणि फीचर्स -Maruti Suzuki S-Presso ला 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 66bhp आउटपूट आणि 89Nm चा टार्क जरनेट करते. हे इंजिन पाईव्ह-स्पीड मॅन्युअल आणि AMT युनिटने जोडले गेले आहे. या कारमध्ये आयडिअल स्टार्ट/स्टॉप देखील मिळते. या कारचे मायलेज एएमटी व्हर्जनसाठी 25.30 kmpl आणि मॅन्युअल व्हेरिअंटसाठी 24.76kmpl पर्यंत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये सेंट्रली-माउंटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टप्ले इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटो गिअर शिफ्ट, सी शेप टेल लॅम्प्स, 14 इंचांचे स्टील व्हील, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs देण्यात आले आहे. एस-प्रेसोचे सर्व व्हेरिअंट ईएसपी आणि हिल-होल्ड असिस्टसह येतात.
मारुती सुझुकी एस-प्रेसो, स्टारी ब्लू, ग्रेनाइट ग्रे, सिल्की सिल्व्हर, फायर रेड, सिझल ऑरेंज आणि सॉलिड व्हाइट एक्सटीरियर शेड्समध्ये सादर करण्यात आली आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसोमध्ये पाच लोकांची बसण्याची क्षमता आहे. Maruti Suzuki S-Presso ची स्पर्धा Renault Kwid आणि Maruti Suzuki Celerio सोबत आहे.