नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 2024 स्विफ्टसाठी बुकिंग सुरू केली आहे. ही कार घेण्यासाठी ग्राहक फक्त सध्या 11,000 रुपये जमा करून बुकिंग करू शकतात. हॅचबॅक कारची फोर्थ जनरेशन 9 मे रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कार निर्माता कंपनी 2024 स्विफ्ट अपडेटसह बाजारात आणणार आहे. कार खरेदीदार एरिना डीलरशिपद्वारे किंवा मारुती सुझुकी अरेना वेबसाइटला भेट देऊन ही कार बुक करू शकतात.
मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी स्विफ्टच्या बुकिंगच्या घोषणेसह या कारच्या विक्रीबद्दल माहिती दिली. पार्थो बॅनर्जी म्हणाले की, मारुती सुझुकीसाठी स्विफ्ट हा एक आयकॉनिक ब्रँड बनला आहे. लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या कारमध्ये वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. तसेच, या ब्रँडच्या 29 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. या कारला मिळालेल्या अवॉर्ड्सवरून दिसून आले आहे कीस स्विफ्ट कशी पुढे जात आहे, असे पार्थो बॅनर्जी म्हणाले.
याचबरोबर, 2024 मारुती सुझुकी स्विफ्ट विविध रेंज व्हेरिएंट्स बाजारात येईल. याशिवाय, या कारमध्ये कलर ऑप्शन्स देण्यात आले आहे. ही कार इवोल्यूशनरी स्टाइलमध्ये प्रदर्शित केली जाईल. या कारमध्ये नवीन ग्रिल, नवीन बंपर, नवीन अलॉय व्हील्स असू शकतात. तसेच, या कारच्या केबिनमध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. आढळू शकते. याशिवाय, मारुती सुझुकी स्विफ्टच्या या अपडेटेड मॉडेलमध्ये 1.2-लीटर, Z-सीरीज (Z12E) पेट्रोल इंजिन असू शकते. तसेच, कारच्या पॉवरट्रेनमध्ये मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्सचा ऑप्शनही दिला जाऊ शकतो.