सर्वांनाच माहीत आहे की, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून दरवर्षी सर्वाधिक गाड्यांची विक्री करते. मात्र, मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कोणत्या? हे अनेकांना माहीत नसेल. काही लोक अल्टोला सर्वाधिक विक्री होणारी कार समजतात. तर काही वॅगनआर, स्विफ्ट आदींना. तर जाणून घेऊयात एप्रिल महिन्यात मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या तीन कारसंदर्भात...
मारुति वॅगनआर (टॉल बॉय) -मारुती वॅगनआर ही एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. एप्रिल महिन्यात या कारच्या एकूण 20,879 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षातील एप्रिल महिन्याच्या तुलनेत या कारच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल (2022) महिन्यात वॅगनआरच्या एकूण 17,766 युनिट्सची विक्री झाली होती. मारुती वॅगनआरचे डिझाइन पाहता हिला 'टॉल बॉय' म्हणूनही ओळखले जाते. हिची सुरुवातीची किंमत 5.54 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. ही कार सीएनजीवर 34.05 km/kg पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.
मारुती स्विफ्ट -गेल्या महिन्यात (एप्रिल 2023) मारुती स्विफ्ट दुसरी क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली. हिच्या एकूण 18,573 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आधारावर हिच्या विक्रीत 111% ची वृद्धी झाली. कारण गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये स्विफ्टच्या एकूण 8898 युनिट्सचीच विक्री झाली होती.
मारुती बलेनो -यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो मारुती सुझुकी बलेनोचा. एप्रिल 2023 मध्ये बलेनोच्या एकूण 16,180 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आधारावर हिच्या विक्रीत 48% एवढी वाढ झाली. गेल्या वर्षी अर्थात एप्रिल 2022 मध्ये हिच्या 10938 युनिटची विक्री झाली होती.