नवी दिल्ली-देशातील सर्वात स्वस्त कार निर्माती कंपनी मारुती सुझूकीनं (Maruti Suzuki) नवी Dzire Tour S सेदान कार लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमतेनं सज्ज असलेली ही कार कंपनीनं पेट्रोल इंजिनसह कंपनी फिटेड सीएनजी किटसोबतची लॉन्च केली आहे. या कारची किंमत ६.५१ लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिअंटची किंमत ७.३६ लाख (एक्स-शोरुम) इतकी आहे. नव्या मॉडलनं याआधीच्या सेकंड जनरेशन टूएअर-एसला रिप्लेस केलं आहे.
Maruti Tour S कार कंपनीच्या डिझायर थर्ड जनरेशन मॉडलवर आधारित आहे. या कारमध्ये कंपनीनं काही खास सेफ्टी फीचर्स देखील दिले आहेत. ज्यामुळे कार आणखी दमदार झाली आहे.
मारुती टूअर एस कारमध्ये एलईडी लाइट्सशिवाय मॅन्युअर एसी, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक इत्यादी फिचर्स दिले आहेत. तसंच कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्राम (EPS), ड्युअर एअरबॅग आणि मुलांसाठी ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स देण्यात आले आहेत.
Maruti Dzire Tour S चे व्हेरिअंट आणि किंमत- Tour S STD (O)- ६.५१ लाख रुपये (एक्स शोरुम)Tour S STD (O) CNG- ७.३६ लाख रुपये (एक्स शोरुम)
पावर आणि परफॉर्मन्स-नव्या Dzire Tour S मध्ये कंपनीनं १.२ लीटर क्षमतेचं K-सीरिज इंजिन दिलं आहे. जे पेट्रोल मोडमध्ये 90hp ची पावर आणि 113Nm चं टॉर्क जनरेट करतं. तर सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 77hp ची पावर आणि 98.5Nm चं टॉर्क जनरेट करतं. कंपनीच्या दाव्यानुसार पेट्रोल मोडमध्ये ही कार 23.15 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी मोडमध्ये ही कार 21 टक्के जास्ट मायलेज देते.