नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियानं नव्या WagonR S-CNGचा बीएस -6 उत्सर्जन मानकांशी सुसंगत सीएनजी मॉडल लाँच केलं आहे. वॅगनआर एस-सीएनजी बीएस-6ची शोरूम किंमत 5.25 लाख रुपयांच्या जवळपास आहे. वॅगनआर एस-सीएनजी बीएस-6चं मॉडल उत्सर्जन मानकांचं पालन करत सादर करण्यात आलं आहे.WagonR S-CNGचा बीएस -6 ची 60 लीटर इंधनाची टाकी असून, 32.52 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते. (सामान्यत: किलोग्रॅममध्ये सीएनजी मोजला जातो. परंतु येथे इंधन टाकीचा आकार लिटरमध्ये सांगितला आहे.) कंपनीनं WagonR S-CNGचा बीएस -6चे दोन मॉडेल एलएक्सआय (Lxi) आणि एलएक्सआय (ओ) LXi(O)ला बाजारात उतरवलं आहे. या मॉडेलची किंमत क्रमशः 5.25 लाख रुपये आणि 5.32 लाख रुपये आहे.कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, मिशन ग्रीन मिलियनची घोषणा करत आम्ही देशाच्या पर्यावरणाला अनुकूल अशी गाडी तयार केली असून, पर्यावरणपूरक गाड्या तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. कंपनीनं ऑटो एक्स्पोमध्ये या गाड्या सादर केल्या होत्या. मिशन ग्रीन मिलियनअंतर्गत काही वर्षांत सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे 10 लाख युनिट्स विकण्याचा कंपनीचा मानस असल्याचं श्रीवास्तव म्हणाले.
Marutiनं लाँच केली WagonR S-CNG, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 08:41 IST