नवी दिल्ली : वाढत चाललेला खर्च, फियाटच्या इंजिनांसाठी गमवावा लागणारा महसूल आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांनी दर्जेदार कार बाजारात उतरविल्याने देशाची सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी काहीशी अस्वस्थ झाली आहे. यामुळे पुढील काही वर्षांत ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल डझनभर कार भारतीय बाजारात उतरविणार आहे.
महत्वाचे म्हणजे मारुतीच्या कारना मोठी मागणी असल्याने ग्राहकांना काही कारसाठी तीन तीन महिने वाट पाहावी लागत आहे. यामुळे कंपनी लवकरच हरियाणा आणि गुजरातमध्ये दोन नवीन कारखाने सुरु करणार आहे. यामुळे मारुतीचे उत्पादन चौपटीने वाढणार आहे. या उत्पादन क्षमतेचा वापर करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती नव्या कार लाँच करणार आहे. याशिवाय टोयोटाच्या कारखान्यामध्येही कारनिर्मिती सुरु होणार आहे.
2020 मध्ये बीएस 6 नियमावली लागू होणार आहे. यामुळे आधीच मारुती सुझुकीला त्यांच्या काही लोकप्रिय गाड्या एकतर बंद कराव्या लागणार आहे. यामुळे या कंपनीला नवीन गाड्या बाजारात आणाव्या लागणारच आहेत. यासाठी मारुती गुरुग्रामच्या मानेसर येथील प्लांट शहराच्या बाहेर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती यासाठी 13 ते 14 हजार कोटी रुपये गुंतविणार आहे. यामुळे पुढील दोन वर्षांत मारुती कमीतकमी 10 ते 12 कार लाँच करणार आहे. यामध्ये काही सध्याच्या कारच्या फेसलिफ्टही असणार आहेत. एवढ्या कार मारुती चार वर्षांत बाजारात आणत होती.
चार नवीन छोट्या कारपुढील दीड वर्षात मारुती चार छोट्या कार लाँच करण्याच्या विचारात आहे. यामध्ये 23 जानेवारीला लाँच होणारी वॅगनआर, फ्युचर कॉन्सेप्ट एस, नवीन जनरेशनची सेलेरिओ आणि वॅगन आर इलेक्ट्रीक कार असेल. या इलेक्ट्रीक कारची सध्या चाचणी सुरु आहे.
या मॉडेल्सच्या फेसलिफ्ट येणार2020 मध्ये सुरक्षेचे नवीन नियम लागू होणार आहेत. यामुळे सध्याची सर्वांच्या आवाक्यात असणारी अल्टो कारमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. शिवाय इग्निस, इको सारख्या कारमध्येही बदल करावे लागतील. स्विफ्ट कारला ग्लोबल एनकॅपमध्ये झिरो स्टार मिळाले आहेत. ही कार हर्टट्रॅक प्लॅटफॉर्मवर आहे. हाच प्लॅटफॉर्म इग्निस आणि बलेनो वापरतात. यामुळे या कारच्या नव्या सुधारित मॉडेल लाँच कराव्या लागणार आहेत. शिवाय टोयोटाची कोरोला अल्टिस ही कारही मारुती नेक्साच्या शोरुमद्वारे विकणार आहे.