नवी दिल्ली : कार मार्केटमधील वाढती स्पर्धा पाहता मारुती सुझुकी आपल्या गाड्या सतत अपडेट करत असते. मारुती सुझुकीने यावर्षी अपडेटेड वॅगनआर लाँच केली. याशिवाय, नवीन एर्टिगा फेसलिफ्ट 2022 चे बुकिंग नुकतेच सुरू झाले आहे आणि आता मारुती सुझुकी XL6 फेसलिफ्ट लॉन्च होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 21 एप्रिल रोजी XL6 फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे.
दरम्यान, XL6 च्या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स मिळू शकतात, असे म्हटले जात आहेत. तसेच त्यात नवीन ग्रिलही मिळू शकते. याशिवाय अलॉय व्हीलचा नवा सेटही दिला जाऊ शकतो. नवीन एलईडी युनिटसह कारला पुन्हा डिझाइन केलेले हेडलॅम्प आणि टेल लॅम्प मिळतील अशी अपेक्षा आहे. XL6 फेसलिफ्टच्या इंटिरियरला अद्याप स्पॉट करण्यात आलेले नाही. मात्र, यामध्येही अपडेट अपेक्षित आहे.
नवीन अपहोल्स्ट्री डिझाइनसह इंटीरियरमध्ये अनेक अपडेट्स मिळू शकतात. कंपनी आपला डॅशबोर्ड नवीन डिझाइनमध्ये सादर करू शकते. बलेनोप्रमाणेच कारमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. कारच्या इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये रिवॉइज्ड ग्राफिक्स मिळू शकतात आणि एक नवीन स्टीयरिंग व्हील देखील दिले जाऊ शकते.
कारमध्ये मिळू शकतात अनेक अॅडव्हान्स फीचर्सXL6 फेसलिफ्टमध्ये क्रूझ कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, इंजिन स्टार्ट/स्टॉप पुश बटण, कीलेस एंट्री, आयडल इंजिन स्टार्ट/स्टॉप यासारख्या अनेक फिचर्ससह येतील. याशिवाय कंपनीला 360-डिग्री देखील मिळेल. पार्किंग कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले सारखे फिचर्स दिले जाऊ शकतात. कंपनीने आपल्या अपडेटेड बलेनोमध्ये पहिल्यांदाच 360-डिग्री पार्किंग कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले दिला आहे.