नवी दिल्ली : निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत. Nissan Magnite ची विशेष किंमत ही 4,99,000 लाखांत ठेवण्यात आली आहे. ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे.
भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. या नव्या छोट्या एसयुव्हीमध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत शैलीदार असे हेडलँप्स, एल-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत. ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे. यामुळे लगेज स्पेस वाढविता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लीटर एवढी आहे.
वेलकम अॅनिमेशनसह ७ इंची टीएफटी मीटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फुल फ्लश टचस्क्रीनसह ८ इंची इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो व बिल्ट इन व्हॉइस रेकग्निशन आदी देण्यात आले आहे. ही कार 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. एचआरएओ १.०-लीटर टर्बो इंजिन देणअयात आले आहे. मॅन्युअल ५ स्पीड आणि एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
सुरक्षेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट (एचबीए), वेहिकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम (टीसीएस), हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए), स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, सेंट्रल लॉकिंग, एसआरएस ड्युअल एअरबॅग सिस्टिम विथ प्रेझेंटेशन व लोडलिमिटर सीटबेल्ट आदी प्रणाली देण्यात आल्या आहेत. ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही मारुतीच्या ब्रेझा, फोर्डच्या इकोस्पोर्ट, टोयोटाच्या अर्बन क्रूझर, ह्युंदाईच्या व्हेन्यू, कियाच्या सोनेट आणि टाटाच्या नेक्सॉनला टक्कर देणार आहे.
किंमत...