ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सुझुकीने 5-डोअर एसयूव्ही जिम्नी शिवाय आणखी एक कार सादर केली आहे. मारुती सुझुकीने गुरुवारी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली मोस्ट डिमांडिंग कार बलेनोवर बेस्ड स्पोर्टी कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्राँक्सचे अनावरण केले आहे. ही कार, ज्या ग्राहकांन हॅचबॅक कारपेक्षा वरच्या सेगमेंटची कार घ्यायची इच्छा आहे, अशा ग्राहकांना आकर्षित करेल. महत्वाचे म्हणज, कंपनीने या कराचे बुकिंगदेखील सुरू केले आहे. ग्राहक ही कार मारुती सुझुकी नेक्साच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून केवळ 11,000 रुपयांत बुक करू शकतात.
कारसोबत देण्यात आले आहेत जबरदस्त फीचर्स - Maruti Suzuki Fronx मध्ये एक स्पोर्टी आणि एअरोडायनामिक सिल्हूट आहे, जो हिला एक मस्कुलर स्टान्स देतो. याच बरोबर NEXWave ग्रिल, क्रिस्टल ब्लॉक LED DRLs आणि एक प्रोग्रेसिव्ह रूफलाइनही देण्यात आले आहे. यात आपल्याला उत्कृष्ट अलॉय व्हील देखील बघायला मिळेल. या कारमध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा, हेडअप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, पॅडल सिफ्टर, 9-इंच एचडी स्मार्ट प्ले प्रो+ इंफोटेनमेंट सिस्टिम, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हिटी बघायला मिळते.
इंजिन स्पेसिफिकेशन -फ्राँक्सच्या इंजिन स्पेसिफिकेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये आपल्याला दोन इंजिन ऑप्शन बघायला मिळतील. यात एक 1.0-लिटर K-सीरीज टर्बो बुस्टरजेट इंजिन बघायला मिळेल. यात प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि पॅडल शिफ्टर्स सह 6-स्पीड ऑटोमॅटिकचा पर्यायासह येईल. यात दुसरे अॅडव्हॉन्स 1.2L के-सीरीज डुअल जेट, डुअल VVT इंजिन बघायला मिळेल. हे आइडल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह येते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि AGS ट्रांसमिशन ऑप्शनसह उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी फ्राँक्स सेफ्टी फीचर्स -सेफ्टीसंदर्भात बोलायचे झाल्यास, Maruti Suzuki Fronx Suzuki च्या सिग्निचर HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. जे एक बळकट बॉडी स्ट्रक्चरसाठी हाय टेंसाइल आणि अल्ट्रा-हाय टेंसाइल स्टीलचा वापर करते. या कारला 6 एअरबॅग, थ्री-लाईन ईएलआर सीटबेल्ट, ईएसपीसह हिल होल्ड असिस्ट आणि रोल ओव्हर मिटिगेशन, एबीएससह ईबीडीसारखे सेफ्टी फीचर्सदेखील देण्यात आले आहेत.