Maruti Cars in India: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही फक्त देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी नाही, तर कार विक्रीच्या बाबतीतही ती नंबर वन कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती आपला पोर्टफोलिओ सतत अपडेट करत आहे. कंपनीची मारुती अल्टो ही गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. याशिवाय मारुतीच्या ब्रेझा, अर्टिगा या गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच मारुती तीन नवीन गाड्यांसह बाजारात धमाका करण्याच्या तयारीत आहे.
Jimny 5-doorदीर्घ प्रतीक्षेनंतर मारुती सुझुकीच्या 5 डोअर जिमनीला अखेर ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले. नेक्सा डीलरशिपवर या वाहनाचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीची टक्कर महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा सोबत आहे. या SUV मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 105 PS पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहेत. मारुती सुझुकी जिमनीची किंमत 9 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
Maruti Fronxऑटो एक्सपो 2023 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली होती. मारुती फ्राँक्स ही मुळात बलेनोवरील क्रॉसओवर आहे. जिमनी प्रमाणेच हीदेखील नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाईल. या गाडीमध्ये हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 6 एअरबॅग्ज आणि 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. या गाडीची किंमत 7-7.5 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Brezza CNGमारुती सुझुकी ब्रेझा लवकरच सीएनजी अवतारात येणार आहे. फॅक्टरी-फिट सीएनजी किट असलेली ही भारतातील पहिली सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही असेल. ही त्याच 1.5-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. सोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. या गाडीचे मायलेज सुमारे 26-27 किमी/किलो असेल. याची किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा जवळपास 90,000 रुपये जास्त आहे.