देशातील सर्वाधिक पसंतीची एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा येत्या काळात मोठा धमाका करणार आहे. मिड एसयुव्ही सेगमेंटची राणी क्रेटाची सीएनजी आवृत्ती आणण्याच्या तयारीत कंपनी आहे. याद्वारे टाटा, मारुतीला टक्कर देण्याची तयारी सुरु झाली आहे.
ह्युंदाईची क्रेटा ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. आताचे मॉडेल तर लुकमुळे लोकांना भुरळ घालत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ह्युंदाई लवकरच सीएनजी व्हेरिअंट आणू शकते. या कारची भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग सुरु आहे. यापूर्वी अल्काझार आणि व्हेन्यूला सीएनजी किटसोबत टेस्टिंग करताना पाहिले गेले आहे.
Creta च्या CNG वेरिएंटमध्ये 1.4-लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. SUV ला 138 bhp आणि 242 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. सीएनजी मोडमध्ये इंजिनला थोडी कमी ताकद मिळेल, परंतु यामुळे एसयूव्हीचे मायलेज वाढेल. सीएनजी क्रेटा फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येईल.
क्रेटा सीएनजी टोयोटा हायरायडरला टक्कर देईल. मारुती लवकरच ग्रँड विटारा सीएनजीमध्ये आणणार आहे. यामुळे क्रेटाला या दोन कारला टक्कर द्यावी लागणार आहे. क्रेटाच्या सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये सुमारे 70 ते 90 हजार रुपयांचा फरक असू शकतो. क्रेटाच्या किंमती रु. 10.44 लाख एक्स-शोरूमपासून सुरू होतात. क्रेटा S, S+, SX या प्रकारात येऊ शकते.