शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मारुतीची सात सीटर वॅगन आर येणार; अर्टिगावर परिणाम होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 3:18 PM

मारुती सुझुकीने नुकतीच Wagon R भारतीय बाजारात नव्या रुपात लाँच केली आहे. आता मारुती सात-सीटर Wagon R लाँच करणार आहे.

मारुती सुझुकीने नुकतीच Wagon R भारतीय बाजारात नव्या रुपात लाँच केली आहे. आता मारुती सात-सीटर Wagon R लाँच करणार आहे. ही कार मारुतीच्या शोरुममधून नाही तर नेक्साच्या डिलरशीपमधून विक्रीस उपलब्ध केली जाईल. नेक्साद्वारे मारुतीच्या प्रिमिअम कारची विक्री केली जाते. मात्र, या कारच्या लाँचला विलंब होत आहे. याचे कारण म्हणजे Wagon R च्या विक्री मंदावल्याचे बोलले जात आहे. 

Maruti Suzuki ने यंदा जानेवारीमध्ये Wagon R लाँच केली होती. ही कार Heartect प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या कारला नवीन रुप देताना काही प्रमाणात कारचा आकार वाढविला आहे. ही कार जास्त प्रिमिअम कशी वाटेल याकडे कंपनीने लक्ष दिले आहे. मारुतीची कार असल्याने विक्री जरी जास्त असली तरीही जुन्या कारच्या तुलनेत कमी आहे. कारण बाजारातही सुस्ती आलेली आहे. या वॅगन आरची 7 सीटर कार आल्यास तिची विक्री जास्त होईल. या कारमध्ये मूळ कारपेक्षा जास्त फिचर्स देण्यात येतील. या कारला टक्कर देण्यासाठी रेनॉल्टची Triber MPV येणार आहे. 

मारुतीकडे सध्या सात सीटरमध्ये अर्टिगा ही कार आहे. मात्र, ही कार 8 लाखांच्या बाहेर जाते. यामुळे 7 लाखांपर्यंत ही कार असल्यास तिला जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. रेनॉल्टची Triber MPV भारतात एक किंवा दोन महिन्यांत लाँच होईल. या कारची एक्स शोरुम किंमत 5.5 लाख ते 8 लाख रुपये असेल. या किंमतीत मारुतीकडे सध्या कोणतीही कार नाही. यामुळे मारुतीची ही नवी कार पर्याय ठरणार आहे. 

मारुती या कारमध्ये 1.2 लीटरचे के सिरिजचे पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन 82 बीएचपीची ताकद देते. गिअरबॉक्स 5 स्पीड मॅन्युअल आणि अॅटोमॅटीक असणार आहे. तसेच ही कार भविष्यात हायब्रीड आणि इलेक्ट्रीक मध्येही येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकार