नवी दिल्ली: भारतात अनेक कोट्याधीश व्यक्तींकडे बीएमडब्लू, ऑडी, रोल्स रॉयस आणि लॅम्बोर्गिनीसारख्या महागड्या कार्स आहेत. पण, भारतात एक असा व्यक्ती आहे, ज्याच्याकडे 'बुगाटी चिरॉन'(bugatti chiron) सुपरकार आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, जगभरात या कारचे फक्त शंभर युनिट असून, त्यापैकी एक या भारतीयाकडे आहे.
कारचे मोठे कलेक्शनअमेरिकेत रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारे भारतीय व्यवसायिक मयुर श्री यांच्याकडे बुगाटी चिरॉन सुपरकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही जगातील सर्वात महाग कार असून, याची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, मयुर श्री यांच्याकडे फक्त बुगाटीच नाही, तर Lamborghini, Aston Martin, Porsche, McLaren, Rolls-Royce यांसारख्या इतर अनेक आलिशान कार आहेत. मयुरच्या वडिलांनी त्यांना ही बुगाटी चिरॉन भेट म्हणून दिली आहे.
सर्वात वेगवान कारपैकी एकबुगाटी चिरॉन ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. कंपनीने या कारचे फक्त 100 युनिट्स बनवले होते आणि त्यातील एक मयुर यांच्याकडे आहे. ही लिमिटेड एडिशन कार असल्यामुळे या कारची किंमतदेखील इतर सुपरकार्समध्ये सर्वात जास्त असल्याचे सांगितले जाते. Bugatti Chiron मध्ये शक्तिशाली 8.0-लीटर क्वाड-टर्बो W16 इंजिन आहे, जे 1479 Bhp आणि 1600 Nm पीक टॉर्क बनवते. बुगाटी चिरॉनचा टॉप स्पीड 420 किमी/ताशी आहे, तर 0-100 किमी/ताशी वेग येण्यासाठी त्याला फक्त 2.3 सेकंद लागतात. स्पीड आणि किमतीनुसार या कारला मजबूत सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत.