जगभरात आपल्या स्पोर्ट्स कारसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटनची कार निर्मात कंपनी मॅक्लॅरेनने (McLaren) भारतात अधिकृतरित्या एन्ट्री केली आहे. मायानगरी मुंबईत या कंपनीने आपला पहिला शोरुम उघडला आहे. कंपनीने आपल्या काही कार भारतात आणल्या आहेत.
प्राइवेट इंपोर्ट इन्फिनिटी कार्स ही कंपनीची भारतातील अधिकृत डीलरशीप आहे. नवीन शोरुम सुरु करतानाच कंपनीने मुंबईतच पहिले सर्व्हिस सेंटर देखील सुरु केले आहे. यासाठी प्रशिक्षित इंजिनिअर नियुक्त करण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी McLaren ही कंपनी भारतीय बाजारात उतरण्याबाबत अभ्यास करत असल्याच्या चर्चा होत्या. इन्फिनिटी कार्सचे कार्यकारी अध्यक्ष ललित चौधरी यांनी याबाबत सांगितले की आम्ही २०१६ पासून मॅक्लॅरेनला भारतात आणण्याची तयारी करत होतो.
ब्रँडसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ बनण्याची कंपनीची अपेक्षा आहे. GT, Artura ते 765LT स्पायडर सारख्या सर्व श्रेणीतील कार भारतात आणण्यात येणार आहेत. कंपनीने लाँचच्या वेळी आपली स्पाईड श्रेणी देखील प्रदर्शित केली. ही कार दोन प्रकारांमध्ये येते, ज्यात 765LT आणि 720S समाविष्ट आहे.
McLaren 765LT Spider765LT या कारमध्ये कंपनीने 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन वापरले आहे जे 765hp ची मजबूत पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी सध्या याचे फक्त 765 युनिट्स ऑफर करणार असून भारतीय बाजारात त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याला फोल्डिंग रूफ देखील मिळते जे फक्त 11 सेकंदात उघडते आणि बंद होते.
McLaren 720S Spider: कंपनीने या कारची किंमत 5.04 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. यात 4.0 लिटर क्षमतेचे ट्विन-टर्बोचार्ज केलेले V8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 720hp ची मजबूत शक्ती आणि 770Nm टॉर्क निर्माण करते. केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग घेते. रुफसह तिचा टॉप स्पीड 341 किमी प्रतितास आहे आणि रुफ दुमडल्यावर ही कार 325 किमी प्रतितास वेगाने धावते.