Mercedes-Benz EQA : लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. Mercedes-Benz EQA असे या EV कारचे नाव आहे. मर्सिडीज-बेंझ EQA सह सध्या कंपनीच्या इंडिया EV लाइन-अपमध्ये EQB 7-सीटर SUV, EQE SUV आणि EQS सेडान आहे. या नवीन मर्सिडीज-बेंझ EQA साठी आजपासून बुकिंग सुरू झाले असून, डिलिव्हरी जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.
किंमत किती? मर्सिडीज-बेंज EQA मध्ये क्रॉसओव्हरसारखी स्टायलिंग असून, फ्रंट ग्रिल पॅनलवर मर्सिडीज सिग्नेचर स्टार पॅटर्न आणि फ्रंटमध्ये रुंद लाईट बार आहे. याचे रिअर डिझाईन EQB सारखेच आहे. कंपनीने ही कार 7 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे. यात पोलर व्हाईट, कॉसमॉस ब्लॅक, माउंटेन ग्रे, हाय-टेक सिल्व्हर, स्पेक्ट्रल ब्लू, पॅटागोनिया रेड मेटॅलिक आणि माउंटेन ग्रे मॅग्नो सामील आहे. कंपनीने या गाडीची किंमत 66 लाख रुपये(एक्स शोरुम) निश्चित केली आहे. मर्सिडीज EQA ची थेट स्पर्धा Volvo XC40 Recharg आणि Kia EV6 सारख्या कारशी असेल.
कारचे इंटेरीअरया कारच्या इंटेरीअरबद्दल बोलायचे झाल्यास, यात डॅशबोर्ड आणि डोअर ट्रिम पीसवर एस क्लास आणि EQS सारखे बॅकलिट स्टार पॅटर्न आहे. याशिवाय, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, डुअल-झोन क्लायमेट कंट्रोल, डिजीटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले, 10.25-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि डॉल्बी एटमॉससह 710W 12-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टम मिळेल.
सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्स सुरक्षेसाठी कारमध्ये 7-एअरबॅग आणि ADAS सारखेच फिचर्स आहेत. विशेष म्हणजे, ही कार सिंगल चार्जवर 560km ची रेंज देते. ही कार 70.5kWh बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. ही बॅटरी फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. ही मेटर 190hp पॉवर आणि 385Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही EV फक्त 8.6 सेकंदात 0-100kph चा वेग पकडू शकते, तर याचा टॉप स्पीड 160kph आहे. 100kW DC फास्ट चार्जने ही कार फक्त 35 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज करता येते. तर, 11kW AC चार्जरद्वारे पूर्ण चार्ज होण्यास 7 तास लागतात.